पारनेर :   फिर्यादिचे वकिलपत्र घेतल्याच्या रागातुन जवळे,  येथील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने पारनेर बारचे सदस्य असलेले वकील सोमनाथ गोपाळे यांना  पारनेर न्यायालय परिसर आणि जवळे येथील कुकडी सहकारी पतसंस्थेच्या आवारात  धमकावून  गलिच्छ शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात  घडला आहे. 

याबाबत धमकावणार्या आरोपी च्या  विरुद्ध अँड.  सोमनाथ गोपाळे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धमकावणारा आरोपी हा मुंबई पोलिस दलातील निवृत्त पोलिस अधिकारी  आहे. 

या गंभीर घटनेची दखल घेवून पारनेर बार असोशिएशने बैठक बोलावली होती. अशा प्रकारांमुळे  वकीलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने, यावेळी  या घटनेचा संघटनेकडून निषेध करण्यात आला. अँड. गोपाळे यांना  धमकावणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी  निवेदनाद्वारे पारनेर पोलिसांकडे केली आहे. 

पारनेर बारचे संघटनेचे अध्यक्ष मंगेश औटी यांचेकडून पारनेर पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी यावेळी  निवेदन स्विकारून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन बारच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी  पारनेर बार संघटनेचे इतर सदस्य मोठ्या संखेने हजर होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version