टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन श्रवण आणि अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. बाबासाहेब शिंदे यांनी केले. ते श्री ढोकेश्वर कॉलेजमध्ये एक दिवसीय कौशल्य विकास पूरक कार्यशाळेमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि अभ्यासाची आवड कमी होत चाललेली आहे ती वाढविण्यासाठी अशा संवाद कार्यशाळेची आवश्यकता आहे.
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. विद्यार्थी विकास मंडळ, आणि श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर हे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, चांगल्या प्रकारचे संवाद कौशल्य असेल तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास निश्चित होतो. संवाद कौशल्यात समय सूचकता हवी देहबोलीचाही प्रभाव संवाद कौशल्या मध्ये अपेक्षित असतो. व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुरेख संवादासाठी अभ्यासच महत्त्वाचा आहे कारण संवाद कौशल्याचे कुठेही वर्ग नाहीत असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत आल्हाट तर आभार विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.किशोर कांबळे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *