पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन (PTMPA) व श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महिला सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत आनंद लॉन्स, पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे होणार आहे.

समाजातील रक्ताची गरज लक्षात घेऊन अधिकाधिक रक्तसंकलन करण्याचा तसेच पारनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. समाजातील नागरिकांनी, युवकांनी तसेच डॉक्टर व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप औटी, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकळे, सचिव डॉ. पांडुरंग थोरात, सहसचिव डॉ. सुशील पादीर, खजिनदार डॉ. अरविंद नांगरे तसेच वर्किंग कमिटी सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.

समाजहिताच्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version