पारनेर | प्रतिनिधी,

भारतीय जनता पक्षाच्या पारनेर तालुका कार्यालयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील थोर लोकशाहीर, साहित्यरत्न आणि उपेक्षित-वंचित समाजाच्या हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजप महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ उमाप, तालुकाध्यक्ष कृष्णा उमाप, सचिव विकास साळवे, मोहन साळवे, भाजप उपाध्यक्ष अर्जुन नवले, युवा मोर्चा चिटणीस मंगेश खोसे, खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रमोद कावरे, युवराज अवचार, राणीताई उमाप, राहुल साळवे, राजेंद्र अवचार, गणेश साळवे, भाऊसाहेब उमाप, देवेंद्र आल्हाट, देवदत्त साळवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांनी आपल्या शाहिरी, कथा, कादंबऱ्या आणि साहित्याच्या माध्यमातून श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली, असे वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करून आणि त्यांच्या विचारांचा समाजात अधिकाधिक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करत करण्यात आला.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि त्यांनी दिलेली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” 

– मा.श्री.विश्वनाथ दादा कोरडे, सदस्य, राज्य परिषद भाजपा महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version