नांदूर पठार येथे मातोश्री हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
पारनेर/प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा शिबिरांमुळे समाजातील गरीब आणि गरजू लोकांना मोठा आधार मिळतो. मातोश्री हॉस्पिटलच्या या सामाजिक कार्यामुळे नांदूर पठारच्या नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल. असे मत नांदूर पठारचे माजी उपसरपंच रवींद्र राजदेव यांनी व्यक्त केले.
नांदूर पठार येथे मातोश्री हॉस्पिटल, आयुर्वेद कॉलेज आणि रिसर्च सेंटरचे मालक डॉ. दीपक आहेर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष नांदूर पठारचे माजी उपसरपंच रविंद्र राजदेव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी गावातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शवत शिबिराला शुभेच्छा दिल्या.शिबिरात डॉ. संतोष घाणे, डॉ. शीतल मॅडम, डॉ. भाग्यश्री मॅडम यांनी वैद्यकीय सेवा पुरवल्या. यासह माधवशेठ आग्रे, बाळू मामा चौधरी, नरसू राजदेव, सेवा सोसायटीचे संचालक शंकरमामा आग्रे, जयराम चौधरी, गीताराम आग्रे, माजी चेअरमन जिजाराम पानसरे, सखाराम हनुमंत आग्रे, पांडा राजदेव, कारभारी घनदाट, रामभाऊ आहेर, कैलास आहेर, रंगनाथ राजदेव, सावकार गाढवे, मच्छिंद्र आग्रे, सदाशिव चौधरी, नामदेव देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे संपूर्ण आयोजन सचिन दाते यांनी यशस्वीपणे पार पाडले.
या शिबिराला गावातील ग्रामस्थ आणि विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. मातोश्री हॉस्पिटलच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामस्थांनी डॉ. दीपक आहेर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे.
