टाकळी ढोकेश्वर, 
        आज सोमवार दिनांक 7/07/2025 रोजी शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणाऱ्या *यशदा* संस्थेमार्फत आयोजित पाच दिवसांच्या निवासी अभ्यास दौरा कार्यक्रमांतर्गत *श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर* या विद्यालयाला परिविक्षाधीन अधिकारी श्रीम. शीतल घोलप (उपजिल्हाधिकारी) , श्रीम. रुपा मोहितकर (बाल विकास प्रकल्प अधिकारी),श्री. सागर वाघमारे (तहसिलदार) ,श्री. गौरव बंग (सहाय्यक राज्य कर आयुक्त), श्री. अनिल काळे (सहाय्यक राज्य कर आयुक्त), श्री. प्रेरक उजगरे (शिक्षाणाधिकारी) यांनी विद्यालयाला भेट दिली. 
       वरील अधिकारी सकाळी ठिक 10.45 वाजता विद्यालयाच्या प्रार्थनेला उपस्थित राहिले व विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यालयाची प्रार्थना, शालेय परिसर, विज्ञान विभागाच्या लॅब, ग्रंथालय शासकीय वस्तीगृह, पोषण आहार, स्पर्धा परीक्षा व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. विद्यालयाच्या विज्ञान विभागामार्फत सुरू केलेल्या CET क्लासच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. 
           विद्यालयाच्या वतीने सर्व परिविक्षाधिन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
        याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक श्रीम. मनीषा गाडगे, शास्त्र समन्वयक श्री. अशोक गांगड, कला समन्वयक श्री. विजय सोबले, ढोकेश्वर वस्तीगृह अधीक्षक श्री. बाळासाहेब रोकडे विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version