पारनेर तालुका पत्रकार संघ व आराध्या बेकर्सचे संचालक नवनाथ गाडगे यांचा सामाजिक उपक्रम 

पारनेर / प्रतिनिधी 
पारनेर तालुका पत्रकार संघ व आराध्या बेकर्सचे संचालक नवनाथ गाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दर्याबाई ,वेल्हाबाई देवस्थान श्री क्षेत्र वडगाव दर्या ता. पारनेर या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यात माकडांसाठी पाच हजार लिटर पाणी व खायला फळांची व्यवस्था करण्यात आली.
    सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस असल्याने वडगाव दर्या परिसरातील विहारी व नद्या, तलाव आटल्याने पाण्याची कमतरता भासू लागली असल्याने वडगाव दर्या येथे असलेल्या माकडाना पाण्याची गरज भासू लागली आहे. माकडांची ही समस्या दूर करण्यासाठी पारनेर तालुका पत्रकार संघ व आराध्या बेकर्सचे संचालक नवनाथ गाडगे यांनी पाच हजार लिटरचा टँकर व कलिंगड, केळी, तरबूज या फळांची व्यवस्था केली होती. या ठिकाणी पाणवठ्यात पाणी सोडताच अनेक लहान मोठ्या माकडाने या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद घेतला. माकडांच्या अंगांची लाही लाही होत असल्याने या पाणवठ्यातील पाण्या मुळे त्यांच्या अंगाला गारवा जाणवत होता. वडगाव दर्या येथील माकडांची संख्या कमी जाणवत होती. या विषयी संबंधितांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या ठिकाणचा डोंगराचा कठडा तुटल्याने बरेच माकडे मृत्युमुखी पडले होती. तसेच या माकडांची प्रजनन क्षमताही कमी झालेली आहे. त्याचे कारण सांगताना गावकरी म्हणाले की, वडगाव दर्या या ठिकाणी पर्यटन साठी आलेले पर्यटक माकडांना खाऊ म्हणून कुरकुरे, बिस्कीट, तेलकट पदार्थ खाऊ घालत असल्याने त्यांच्या प्रजनन क्षमता मध्ये परिणाम झाल्याची शक्यता गावकरी व्यक्त करत आहेत. माकडांची यांचं खान फुटाणे, फळे, बियांची फळे पर्यटकांनी खाऊ घालावीत अशी विनंती गावकरी करत आहेत. या वाढल्या उन्हामुळे माकडांना पाणवठ्यात पाणी कमी पडत आहे. त्या मुळे स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वनविभाग यांनी लक्ष घालून पंधरा दिवसातून एकदा पाणवठा भरला गेला पाहिजे तरच येथील माकडे जगू शकतील.
    या सामाजिक उपक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचूडे सर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर,विनोद गोळे, शशिकांत भालेकर, संतोष सोबले, गणेश जगदाळे, भास्कर पोपळघट, सतीश ठुबे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर आणि पत्रकार भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version