पारनेर / भगवान गायकवाड, 
      विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच कान्हुर पठार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गणपती फाटा(कान्हुर पठार –पारनेर रोड) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ही स्पर्धा दि.11 ते 25 डिसेंबर दरम्यान होत आहे.

     युवा मंचातर्फे आयोजित या स्पर्धेत परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला असून, क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

   स्पर्धेचे उद्घाटन गणपती फाटा येथील मैदानावर भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांसह भाजप उपाध्यक्ष अर्जुन नवले, मा.सरपंच बाळासाहेब रेपाळे, सुशांत ठुबे, मोहन काळे, रमेश गाडगे, स्वप्निल गायकवाड, एकनाथ तिकोणे, सखाराम भागवत, सुभाष शिंदे, स्वप्निल ठुबे, निकेतन ठुबे, कालिदास लोंढे, युसुफ इनामदार, बाळकृष्ण व्यवहारे, श्रीकांत ठुबे, प्रशांत खामकर यांसह परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी युवा मंचचे सर्व सदस्य, परिसरातील ग्रामस्थ, विविध संघांचे खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

    उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी ‘विश्वनाथ दादा कोरडे युवा मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. तरुणांनी अशा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपले खेळाचे कौशल्य दाखवावे.” तसेच, त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

    या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले आहेत. सामने अत्यंत चुरशीचे होतील अशी अपेक्षा असून, विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

    ही स्पर्धा भरविण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी बबन व्यवहारे, कानिफनाथ ठुबे, मा.सरपंच बाळासाहेब रेपाळे, मा.उपसरपंच सागर व्यवहारे, मंगेश खोसे, गोकुळ ठुबे, स्वप्निल ठुबे, प्रवीण व्यवहारे, अनिल कोरडे, सुनील चिर्के, गणेश ठुबे, सतीश ठुबे, प्रसाद ठुबे, सईब इनामदार, दादासाहेब ठुबे, सावकारशेठ बुचुडे, विशाल लोंढे,विश्वासशेठ डोंगरे, स्वप्निल सोमवंशी, प्रशांत पावडे, तेजस ठुबे, रवींद्र ठुबे, अमोल ठुबे, दीपक लोंढे, ज्ञानदेव ठुबे इ सहकारी मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version