टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार बाळासाहेब गायकवाड यांचा सत्कार

टाकळी ढोकेश्वर :
 राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार विनोद उर्फ बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने टाकळी ढोकेश्वर येथे सावली प्रतिष्ठान आणि सावली हॉस्पिटलच्या वतीने डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी जाहीर सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार समारंभात पळशी येथील माजी सरपंच संतोष जाधव, भाजप नेते योगेश रोकडे, कारेगावचे उपसरपंच अशोक पंडित, युवा नेते राहुल घुले, पेमराज पारधी, पत्रकार श्रीनिवास शिंदे, पत्रकार गणेश जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब गायकवाड यांच्या पत्रकारितेतील योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडून सामाजिक बदल घडवण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले.डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी गायकवाड यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी बोलताना डॉ. खिलारी म्हणाले, “बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेतून समाजातील वंचितांचा आवाज बुलंद केला आहे. त्यांची ही निवड आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.” गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले आणि पुढील काळातही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.या सोहळ्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गायकवाड यांच्या या यशामुळे टाकळी ढोकेश्वर गावाचा नावलौकिक वाढला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सावली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. हा सत्कार सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, गायकवाड यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version