शिक्षकांनी प्रामाणिकपणे, कर्तव्य निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करावे: रामचंद्र दरे
टाकळी ढोकेश्वर : शिक्षक हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मूल्ये आणि ज्ञान निर्माण होऊ शकते. शिक्षकांनी जर स्वतःच्या कर्तव्याबद्दल निष्ठावंत राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तर विदयार्थ्यांच्या जीवनात आयुष्यभरासाठी सकारात्मक बदल घडू शकतात. म्हणून शिक्षकांनी प्राचार्य सुनिल वाव्हळ सरांप्रमाणे प्रामाणिकपणे, कर्तव्य निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करावे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे साहेब यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुनिल वाव्हळ हे आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सेवापुर्ती गौरव कार्यक्रम विद्यालयाने आयोजित केला होता. त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मा. सिताराम आण्णा खिलारी हे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना आण्णा म्हणाले की, ज्याप्रमाणे प्राचार्य सुनिल वाव्हळ यांनी संस्थेमध्ये निष्ठेने काम केले तसेच काम शिक्षकांनी संस्थेबद्दल, विद्यालयाबद्दल, आत्मीयता दाखवून निःस्पृह भावनेने करावे.
यावेळी शाळा समिती सदस्या कल्पनाजी वायकर मॅडम, प्राचार्य विजयकुमार पोकळे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी सरपंच शिवाजी काका खिलारी, पत्रकार बबनराव गायके, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब निवडुंगे, विजया वाव्हळ, आशुतोष वाव्हळ, कांचन वाव्हळ, कु. सेजल गायकवाड, कु.नम्रता बांडे, कु.सायली माकरे यांनी प्राचार्य सुनिल वाव्हळ सर यांना भावी जीवनासाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रसंगी विद्यालयाचे कला शिक्षक नारायण शेळके यांनी प्राचार्य सुनिल वाव्हळ यांचे केलेले पेन्सिल स्केच भेट दिले.
या प्रसंगी प्राचार्य लक्ष्मण मतकर, संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी, खरेदी विक्री संघांचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हा.चेअरमन विलासराव झावरे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, मोहन रोकडे, शिक्षक सोसायटी संचालक राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे आणि विजय पठारे तसेच बाबासाहेब ढूस, नारायण खिलारी गुरुजी, शिवाजीराव खिलारी, विठ्ठल बांडे गुरुजी, शिवाजी सावंत, बापूसाहेब होळकर, जयवंत पुजारी, सतीश फापाळे, गलांडे सर, उत्तमराव निकम, संतोष इंगळे, बाबाजी शिंदे, केरुभाऊ चत्तर, आदम शेख, साधू भोंडवे, अशोक शेंडगे, आसाराम नलगे, अशोक शेजवळ, बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब रांधवण, विनोद गायकवाड, संजय मोरे, वसंत रांधवण, प्रसाद महाराज खिलारी, जनार्दन पठारे, सुरेंद्र पेटकर, शिंदे मॅडम, शिरीष टेकाडे, कैलास मोकळे, सुरेंद्र चव्हाण, नरवटे सर, संतोष व्यवहारे, संदीप खिलारी, सुभाष अडसूळ सर, राहुल नवले, सोनटक्के सर, विजय जाधव, बी. के. झावरे, बोठे सर, दशरथ पवार, सुमन वाव्हळ, कारभारी वाव्हळ, बाळासाहेब वाव्हळ, कचरु वाव्हळ विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ढोकेश्वर वसतिगृहाचे अधीक्षक सर्व कर्मचारी, सर्व विद्यार्थी, अहिल्यानगर, नेवासा व पारनेर तालुक्यातील अनेक माजी मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परिसरातील पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी यांनी केले, अध्यक्ष निवड प्रा. शिवाजी नरसाळे यांनी केली, सूत्रसंचालन सोनल रोहकले आणि भाऊसाहेब हिंगडे यांनी केले तर आभार रवींद्र मते यांनी मानले.
