टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा – सोनियाताई राजदेव
टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी,
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे, स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी घ्यावी, या उद्देशाने ‘महिला उद्योजक मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू पाहणाऱ्या महिलांसाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरणार आहे.
या मेळाव्यात महिलांना व्यवसायाची निवड, आवश्यक प्रशिक्षण, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, शासकीय योजना, बँक कर्ज व सबसिडी, बाजारपेठ, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय विस्तार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
◾विविध व्यवसायांच्या संधी
महिलांना शिवणकाम व रेडीमेड कपडे, अगरबत्ती व धूप निर्मिती, मेणबत्ती, पापड-लोणचे-मसाले, ज्वेलरी, पॅकिंग उद्योग, एम्ब्रॉयडरी, गोमयापासून विविध वस्तू, बेकरी व नानकटाई, चिक्की, मिलेट आधारित खाद्यपदार्थ, पेपर बॅग व कापडी पिशव्या, साबण व डिटर्जंट, फिनाईल व हँडवॉश, सेंद्रिय खत व वर्मी कम्पोस्ट, सॅनिटरी नॅपकिन, ब्युटी पार्लर, डिजिटल प्रिंटिंग, कस्टम गिफ्ट्स, खाद्यप्रक्रिया, टिफिन व केटरिंग, मशरूम शेती, मधमाशी पालन, डिजिटल मार्केटिंग, डेटा एंट्री यांसह विविध स्वयंरोजगार व लघुउद्योगांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
◾कर्ज, सबसिडीपासून मार्केटिंगपर्यंत मार्गदर्शन
मेळाव्याचा प्रमुख उद्देश केवळ व्यवसायाची माहिती देणे नसून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मशिनरी, शासकीय योजना, बँक कर्ज, सबसिडी, बाजारपेठ व मार्केट लिंकिंग याबाबत योग्य दिशा देणे हा आहे. डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडियाचा वापर करून व्यवसाय वाढविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘महिला सक्षम तर कुटुंब सक्षम; महिला उद्योजक तर समाज आत्मनिर्भर’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
◾कोण सहभागी होऊ शकतात?
महिला उद्योजक, उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या महिला तसेच SC/ST प्रवर्गातील महिला या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी ही महत्त्वाची संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
◾नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. नोंदणी करताना आपले नाव, गाव, मोबाईल क्रमांक, कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसायाचा अनुभव असल्यास त्याची माहिती तसेच कोणत्या विषयात मार्गदर्शन आवश्यक आहे, ही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन मा. डॉ. निलेश लंके, खासदार, अहिल्यानगर दक्षिण व कौशल्य विकास अभियान, महाराष्ट्र तसेच निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव व श्री. रविंद्र राजदेव, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट नेते यांच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
नाव नोंदणीसाठी संपर्क :-
सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट
श्री. रविंद्र राजदेव जनसंपर्क कार्यालय
यश अपार्टमेंट, कल्याण-अहिल्यानगर बायपास, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
मोबाईल : ९९२२७७०८५७ | ९८५०४७१०७५
“एक संधी – एक व्यवसाय – आत्मनिर्भर भविष्य!”
महिलांनी, बचत गटांनी, महिला मंडळांनी आणि व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक महिलेने या उपक्रमाची माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




