पारनेर/ भगवान गायकवाड,
पारनेर येथील डॉ. रफिक सय्यद (पारनेरकर) यांच्या ‘आनंद हॉस्पिटल’मध्ये नुकताच भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. निमित्त होते एका अविस्मरणीय मेळाव्याचे, ज्याचे रूपांतर एका अविस्मरणीय ‘सृजनाच्या सोहळ्यात’ झाले.या आनंद मेळा मध्ये ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सोपानकाका औटी, ह.भ.प. पांडुरंग महाराज गाडेकर ह.भ.प. यासीनभाई तांबोळी( काष्टीकर ) आणि ह.भ.प. गुलाबभाई तांबोळी या वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
याप्रसंगी सन्माननीय सद्भावना मंचचे पदाधिकारी हमजेखा मोमीन, ज्येष्ठ पत्रकार भगवान गायकवाड आणि संत साहित्याचे अभ्यासक मारुती शेरकर( सर ) आदी मान्यवर उपस्थित होते. “धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि अध्यात्माची जोड कशी असावी, हेच या सोहळ्याने सिद्ध केले,” आनंद हॉस्पिटलमध्ये जमलेल्या या दिग्गजांच्या उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘आनंद मेळा’ ठरला.
