पारनेर | ता. प्रतिनिधी,   

पारनेर तालुक्यातील बुगेवाडी येथे सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. रस्ते, पायाभूत सुविधा व ग्रामविकासाला चालना देणाऱ्या या विकासकामांमुळे बुगेवाडीच्या सर्वांगीण प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. 

यावेळी आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “विकास हीच आपली राजकारणाची खरी ओळख आहे. गावागावांत मूलभूत सुविधा निर्माण करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे, प्रत्येक वस्तीपर्यंत दर्जेदार रस्ते, पाणी, वीज आणि आवश्यक सुविधा पोहोचविणे हेच माझे ध्येय आहे. मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत विकासाची ही वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने सुरू राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या विकासकामांमुळे बुगेवाडीसह परीसरातील दळणवळण अधिक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातही बुगेवाडीसह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, नगरसेवक अशोक चेडे, शहराध्यक्ष राजेंद्र औटी, सुनील गाडगे, नगरसेवक नवनाथ सोबले, शहरप्रमुख कविता औटी, सखाराम बुगे, रामदास कावरे, विजय कावरे, सुनिता सोबले, कुंडलिक कावरे, साहेबराव बुगे, ठकाराम बुगे, विठ्ठल कावरे, सिताराम बुगे, शिवाजी काळे, रोहीदास भुसारे, मंगेश कावरे, प्रतिभा कावरे, संतोष थोरात, रामदास वाळुंज, सागर वैद्य, सोपान कावरे, कोंडीभाऊ थोरात, शरद कावरे, प्रशांत कावरे, मयुर कावरे, यश बुगे, बाळासाहेब सोनवणे, चिन्मय कावरे, शांताराम तराळ, प्रसाद बुगे, प्रतिक चत्तर, भानुदास कावरे, संपत वारे, गणेश बुगे, सखाराम कावरे, धनाजी थोरात, रामदास थोरात, भाऊसाहेब बुगे, सुनील कावरे, इंजि. प्रताप अंबुले, फारुख शेख, नागेश रोहोकले यांच्यासह अनेक मान्यवर, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासकामांच्या शुभारंभामुळे बुगेवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी आमदार काशिनाथ दाते सरांचे आभार व्यक्त करत विकासाची ही गती भविष्यातही कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

🔶🔶🔶🔶🔶🔶➖
◼️ “आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुगेवाडी परिसरातील तब्बल एक कोटी रुपयांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. या विकासकामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणारे आमदार काशिनाथ दाते सर यांचे नेतृत्व पारनेर तालुक्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे,”

— विठ्ठल कावरे, उद्योजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version