तालुक्यात सुजित झावरे पाटील यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून ओळख
कामाच्या जोरावर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील युवकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरावे असे व्यक्तिमत्व म्हणजे माळकुप गावचे सुपुत्र उद्योजक स्वप्नील राहींज होय. सामाजिक बांधिलकी जपत पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित झावरे पाटील तसेच देवकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारण समाजकारणात स्वप्नील राहींज हे गेल्या १५ वर्षापासून सक्रिय आहेत.
घरी कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना उद्योग व्यवसाय करत असतानाच समाजकारण व राजकारणाची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी माळकुप व परिसरातील आदिवासी सर्वसामान्य घटकातील जनतेचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना युवा नेते स्वप्निल राहींज यांनी नेहमीच समाज उपयोगी काम केले आहे.
संघर्षमय प्रवास करत आज उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रेरणादायी युवा उद्योजक म्हणून सुद्धा स्वप्निल राहींज यांना ओळखले जाते. माळकूप व परिसराच्या विकासासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.
सक्रिय राजकारणात सहभाग घेतल्यानंतर देवकृपा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राहींज यांनी राबविले तसेच माळकूप सेवा सोसायटीमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. युवा नेते स्वप्निल राहींज यांनी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुद्धा लढवली आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, भाळवणी, माळकुप या भागात काम करत असताना एक ‘स्मार्ट वर्क’ करणारा युवा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील भाळवणी पंचायत समिती गणा मधून स्वप्निल राहींज हे इच्छुक उमेदवार आहेत. संधी मिळाल्यास ते निवडणूक लढवतील त्यांचे या भागात असलेले युवकांचे संघटन सर्व सामान्य जनतेशी असलेली नाळ मोठ्या भावाप्रमाणे सुजित झावरे पाटील यांचा नेहमी असलेला यांच्या डोक्यावरील हात ही त्यांच्या निवडणूक लढवण्यासाठी जमेची बाजू असतील.
2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांना माळकुप परिसरात मधून मोठे माताधिक्य देण्यामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख भूमिका स्वप्निल राहींज यांनी बजावली आहे. राहींज हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते राहिलेले आहेत. स्वप्निल राहिंज यांचे ढवळपुरी परिसरामध्ये मोठे युवा संघटन आहे एक सच्चा युवा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पाहिले जाते. अशा या प्रभावशाली युवा नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…
