पारनेर / भगवान गायकवाड,
सध्या नगर पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे गटेवाडी ,जातेगाव, घाणेगाव ,नारायणगहाण येथील नागरिकांना शिरूर व पारनेर ला जाण्यासाठी तसेच वयोवृध्द, नागरीक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना जाण्यासाठी नगर पुणे महामार्गावर जावा लागते. नागरीकांची गैरसोय थांबावी म्हणुन ही बस पुन्हा नव्याने चालु करा पारनेर वडनेर-गटेवाडी घाणेगाव जातेगाव नारायणगव्हाण शिरूर ही बस गेली २५ ते वर्षापासन सुरु होती केलेली बस सुरू करा.
पारनेर गटेवाडी जातेगाव नारायणगव्हाण शिरूर अशी १० वर्षापुर्वी पासून अनेक वर्षे सुरू होती. त्यामुळे वडनेर, घाणेगाव, गटेवाडी, जातेगाव, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी इ. गावातील हायस्कूल व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर बस फार सोईस्कर होती. सदर बस कोणतेही संयुक्तीक कारण नसताना बंद केलेली आहे.
तरी सदर बस सेवा त्वरीत सुरू करावी ही विनंती. असे निवेदन पारनेर आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.
सुरेश बबन बोन्हुडे माजी सरपंच नारायणगव्हाण तथा
उपाध्यक्ष, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव, जयसिंग बबन धोत्रे, माजी सरपंच वाडेगव्हाण विशवस्त, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव चे मा सरपंच विठ्ठल पोटघन, विशाल हरिभाऊ फटांगडे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
नुकतेच महाराष्ट्र शासनाने जातेगाव मध्ये असणारे श्री भैरवनाथ देवस्थानचा ब वर्गात समावेश केलेला असून त्यामुळे जातेगाव मध्ये भावीकांची गर्दी वाढत आहे. ही बस चालु झाल्यानंतर भाविकांना येण्या जाण्यास मदत होईल.
– विशाल फटांगडे.
सहसचिव, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट जातेगाव
