पारनेर / भगवान गायकवाड,
पूर्णवाद युवा फोरम व पूर्णकन्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुपौर्णिमा युवक विजयोच्छव २०२५ निमित्त प. पू. विद्यासागर ऍड. श्रीविष्णू महाराज पारनेरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पारनेर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारनेर मुली व मुले, तसेच न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, चित्रकला साहित्य इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप शिवानीताई लक्ष्मीकांत पारनेरकर, पूर्णेश जोशी, चारूताई हिंगे, प्रांजली पारनेरकर, वैष्णवी कुलकर्णी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संजया नवले यांनी केले तर आभार शाळेचे उपशिक्षक चंद्रकांत गट यांनी केले.
