पारनेर तालुक्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण 35 वर्षापासून योगदान असणारे विश्वनाथ बांडे व अंजना बांडे दाम्पत्य

पारनेर /प्रतिनिधी, 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा राजकीयदृष्ट्या जागरूक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला तालुका मानला जातो. येथील टाकळी ढोकेश्वर हे गाव गेल्या अनेक दशकांपासून राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे केंद्र राहिले आहे. या गावातील श्री. विश्वनाथ मारुती बांडे व सौ. अंजना विश्वनाथ बांडे हे पती-पत्नी गेली ३५ हून अधिक वर्षे पारनेर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात अतिशय निष्ठेने व सातत्याने कार्यरत आहेत.

श्री. विश्वनाथ बांडे यांनी १९७० ते १९८५ या काळात मुंबईत निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रभावी काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्यांना पारनेर व अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. १९८०-८५ या काळात ते पारनेर तालुका प्रमुख होते. तसेच अहमदनगर येथे जिल्हा मजदूर सेनेचे सचिव म्हणून कामगार हितासाठी मोठे योगदान दिले.

१९८५ नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला आपले पूर्ण वेळ दिले. सध्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय संघटनात्मक काम त्यांनी यशस्वीपणे पेलले. आजही ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून पारनेर तालुक्यात सक्रिय आहेत.

सौ. अंजना विश्वनाथ बांडे या देखील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जिद्दी व कर्तृत्ववान महिला आहेत. १९९९ साली त्यांनी नामदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती व चांगली मते मिळवली होती. १९९० पासून त्या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहेत. पारनेर तालुक्यात शेकडो बचत गट उभारून त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे.

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून त्यांनी पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. आदर्श गाव योजनेच्या अंतर्गत टाकळी ढोकेश्वरचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी आदर्शगाव सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे पाठपुरावा केला व यश मिळवले. ग्रामसभेने त्यांची आदर्श गाव महिला प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. गावातील महिलांना एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले, ज्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.


आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत टाकळी ढोकेश्वर गटातून महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी सौ. अंजना बांडे यांची इच्छा आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत विचारणा केली असून, पक्षाने विश्वास टाकला तर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे. बांडे परिवाराचे पारनेर तालुक्यात मोठे नाते-गोते व मित्रमंडळ आहे. तसेच मुंबई-नवी मुंबई परिसरात स्थायिक असलेले पारनेर व अहमदनगर जिल्ह्यातील हजारो लोकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. हा संपर्क पक्षाच्या बळकटीसाठी निश्चित उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दशकांत भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना या दाम्पत्याच्या कामाची दखल घेऊन पद्मभूषण अण्णा हजारे, तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली होती. मात्र पक्षीय ध्येय-धोरणामुळे त्यांना संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी खचून न जाता आपले सामाजिक व राजकीय कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.
विश्वनाथ बांडे व अंजना बांडे हे दाम्पत्य राजकारणापलीकडे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी टाकळी ढोकेश्वरसह संपूर्ण पारनेर तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यास, टाकळी ढोकेश्वर गटाचा कायापालट होईल असा विश्वास स्थानिकांमध्ये आहे.
महायुतीच्या नेत्यांनी या निष्ठावान व अनुभवी दाम्पत्याच्या योगदानाचा विचार करून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सौ. अंजना विश्वनाथ बांडे यांना टाकळी ढोकेश्वर गटातून उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶
पंचायत समिती गण – टाकळी ढोकेश्वर 
***********************************

“अंजनाताई बांडे आमच्या सगळ्या महीलांसाठी रोल मॉडेल आहेत. १९९० मध्ये जेव्हा बचत गटाचं नावही कोणी घेत नव्हतं, तेव्हा त्यांनी गावोगाव जाऊन बायकांना एकत्र केलं. आज माझ्यासारख्या कित्येक बायकांना त्यांच्यामुळेच स्वतःच्या पायावर उभं राहता आलं. विश्वनाथ काका तर पारनेरमध्ये जिथे भाजप-शिवसेना युती मजबूत आहे, तिथे त्यांचा फार मोठा वाटा आहे. आता अंजनाताई जिल्हा परिषदेला लढणार म्हणून आम्ही सगळ्या बचत गटांच्या बायका त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या आहोत. टाकळी ढोकेश्वर गटातून महायुतीची उमेदवारी अंजनाताईंनाच मिळाली पाहिजे. त्या निवडून आल्या की आमच्या भागातील महिला व मुलींच्या शिक्षणाला, आरोग्याला आणि रोजगाराला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. अंजनाताईंना विजयी करणं, ही आमची जबाबदारी आहे!”


मी वडगाव सावताळ च्या माजी सरपंच पदी काम करत गावचा विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर दक्षिणची सक्रिय जिल्हा कार्यकारणी सदस्य असून पारनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या विविध उपक्रमांमध्ये माझा सक्रिय सहभाग असुन पक्ष वाढीसाठी काम करत आहे. 
मी देखील टाकळी ढोकेश्वर गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असून अंजनाताई बांडे यांच्या विजयामध्येच मला माझ्या विजयाची देखील खात्री आहे.

– छाया धनंजय शिंदे, वडगाव सावताळ.


🔶🔶🔶🔶🔶

            पंचायत समिती गण – कर्जुले हर्या 
     ***********************************

“विश्वनाथ बांडे आणि अंजनाताई बांडे यांनी १९८० पासून आजतागायत जे काम त्यांनी पक्षासाठी, गावासाठी, महिलांसाठी केलंय ते पाहिलं की मन अभिमानाने भरून येतं. विश्वनाथरावांनी मुंबईतून शिवसेना उभी केली, नंतर फडणवीस साहेबांसोबत भाजपला बळ दिलं. अंजनाताईंनी बचत गट उभे करून शेकडो बायका स्वावलंबी केल्या. आदर्श गाव योजनेतही त्यांनी गावाला पुढे नेलं. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, तर अंजनाताईंना उमेदवारी मिळाली की टाकळी ढोकेश्वर गटाचा खरंच कायापालट होईल. दोघांच्याही निष्ठेला आणि मेहनतेला मी मनापासून सलाम करतो. महायुतीने त्यांच्यावर विश्वास टाकावा, हीच अपेक्षा!” त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी पंचायत समिती निवणुकीसाठी कर्जुले हर्या गणातून उमेदवारी साठी इच्छुक असून अंजना बांडे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यास त्या निश्चितच विजयी होतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मला माझ्या विजयाची देखील खात्री आहे.
मी सलग १५ वर्ष काटाळवेढा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच या पदी कार्यरत राहून गावचा विकास केला आहे. ४० वर्ष वि.वि.कार्य.सेवा सह.सोसायटीचे सदस्य पैकी चार टर्म चेअरमन आणि विद्यमान संचालक म्हणून काम पाहिले आहे. 
— ठकाजी कडूसकर, 
माजी सरपंच, काताळवेढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version