पारनेर / भगवान गायकवाड,
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालय पारनेर येथे लोकशाहीला पूरक असा उपक्रम राबविण्यात आला .त्याद्वारे एक निवडणूक कृती कार्यक्रम आखण्यात आला त्यातून स्वयंशासन मंडळातील वर्ग प्रमुख व उपवर्ग प्रमुख यांची लोकशाही पद्धतीने मोबाईल ईव्हीएम द्वारे निवडणूक पार पडली . इयत्ता पाचवी ते दहावी मधील वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करून वर्ग प्रमुख व उपवर्ग प्रमुख निवडले. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची परिपूर्ण माहिती देण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती मतदान करताना आनंद दिसत होता. स्वतः विद्यार्थी मतदान करणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ही प्रक्रिया पार पाडण्याकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कासार आर . व्हीं. यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तर श्री. गायकवाड एस .आर यांनी झोनल अधिकारी, तसेच सर्व वर्ग शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. त्याद्वारे शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील प्रत्येक वर्गाचे स्वयंशासन मंडळ निवडण्यात आले.
