सेवेकरी संतोष गायखे यांची माहिती


पारनेर / प्रतिनिधी, 
श्रीक्षेत्र काळेवाडी सावरगाव येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठात पंचमदिनी कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ ते रविवार, ४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, ह भ प डॉ. नारायण महाराज जाधव (डॉक्टर बाबा) आळंदी देवाची यांच्या मार्गदर्शनाखाली व अनंत मठाच्या प्रेरणास्थान गुरु माऊली सुनिता पोतदार काकी यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य सद्गुरु अनंत पोतदार काका यांच्या पुण्यतिथी निमित्ताने साजरा होत आहे.

या महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकारांची सेवा होणार आहे. ह.भ.प. तृप्तीताई शिर्के महाराज, ह.भ.प. सुमित महाराज झावरे, ह.भ.प. अशोक महाराज शिंदे आणि ह.भ.प. बाबासाहेब महाराज वाणी यांचे कीर्तन होईल. विशेष म्हणजे, रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर संगमनेर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या उत्सवात ह.भ.प. तृप्ती ताई शिर्के महाराज आळंदी देवाची गुरु लीलामृत ग्रंथ पारायणाचे नेतृत्व करणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा अशी आहे: पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता ग्रंथ पूजन, विना पूजन आणि प्रतिमा पूजन, सकाळी ८ ते ११ गुरु लीलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर नैवेद्य आरती, रात्री ७ ते ९ कीर्तन, नंतर महाप्रसाद आणि भजनी मंडळाचा जागर. हे सर्व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरे होतील.
या महोत्सवाला डॉ. अभिजीत पंडित, रेवनाथ चिकणे आणि म्हातारबा गायखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाचे नियोजन अनंत मठातील सर्व स्वामी सेवेकरी महिला व पुरुष तसेच काळेवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे. विशेष सहकार्य काळेवाडी, लांडगेवाडी आणि सावरगाव परिसरातील समस्त ग्रामस्थांचे असणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
श्री स्वामी समर्थ अनंत मठातील पंचदिनी कीर्तन महोत्सव सद्गुरु अनंत पोतदार काका यांच्या पुण्यतिथी निमित्त साजरा होत आहे. गुरुमाऊली सुनिता पोतदार काकींच्या आशीर्वादाने व प्रसिद्ध कीर्तनकारांच्या सेवेने हा उत्सव भक्तिमय होईल. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजन यशस्वी होत आहे. हा महोत्सव सद्गुरुंच्या स्मृतीत आणि भक्तीच्या प्रसारासाठी आहे. सर्व भक्तांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आहे. हा महोत्सव परिसरातील धार्मिक एकात्मतेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास आहे.

–  उद्योजक संतोष गायखे
 (सेवेकरी श्री स्वामी समर्थ अनंतमठ, काळेवाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version