पारनेर / ता. प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील बाभुळवाडा परिसरातील पायाभूत सुविधा आणि जलसंधारणाला बळ देणाऱ्या विकासकामांचा शुभारंभ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यामध्ये बाभुळवाडा ते दरोडी रस्ता मुरुमीकरण काम तसेच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या को.प. बंधारा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने ही दोन्ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या कामांमुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि वाहनधारकांना मोठा लाभ मिळणार असून सिंचन व्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार दाते सर म्हणाले, “ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करायचा असेल तर रस्ते आणि पाणी या मूलभूत गरजांवर भर देणे आवश्यक आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाला चांगले रस्ते, पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. विकासकामे ही केवळ निधीची नव्हे तर जनतेच्या विश्वासाची आणि भविष्यातील समृद्धीची गुंतवणूक असते.”
या प्रसंगी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, प्रशांत जगदाळे, देवेंद्र जगदाळे, डॉ. सुरेश खणकर, विशाल खणकर, मनसुख कोरडे, दिगंबर जगदाळे, जयराम जगदाळे, प्रमोद खणकर, वसंत मातेरे, अच्युतराव जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, भिवाजी जगदाळे, निशिगंधा बोरुडे, भाऊसाहेब जगदाळे, बबन शिर्के, महादू जगदाळे, संतोष बोरुडे, निशिगंधा बोरुडे, रेवणनाथ खणकर, शरद जगदाळे, अविनाश जगदाळे, दत्तात्रय क्षीरसागर, उत्तम जगदाळे, जय शिर्के, भाऊ खोडदे, भाऊ पटाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते आणि जलसंधारण या दोन्ही क्षेत्रांतील विकासकामांमुळे बाभुळवाडा परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला नवी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामांचा वेग वाढत असून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचेही यावेळी नागरिकांनी नमूद केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ “बाभुळवाडा परिसरातील रस्ता मुरुमीकरण आणि को.प. बंधारा ही दोन्ही कामे गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आमदार काशिनाथ दाते सर यांनी मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे. विशेषतः जलसंधारण आणि रस्ते विकासामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन विकासाचा निधी गावागावांत पोहोचविण्याचे काम आ. दाते सर सातत्याने करत आहेत. या कामांमुळे बाभुळवाडा परिसराच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल.”
– वसंतराव चेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
