कुरुंद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पारनेर / ता. प्रतिनिधी,  

सोमवार दि. २० एप्रिल २०२६ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विकासकामांना वेग देत सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत कुरुंद येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. या उपक्रमामुळे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी आमदार दाते सर म्हणाले की, “विकास हा केवळ कागदावर वा भाषणापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक गावापर्यंत आणि गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलाच पाहिजे, हा माझ्या आजवरच्या राजकीय वाटचालीतील कायमचा ध्यास आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हेच माझे खरे ध्येय आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करताना कुणीही वंचित राहणार नाही. ह्याची मी कायम दक्षता घेत आलोय व घेत राहील. ”

त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षण, रस्ते, सामाजिक सुविधा आणि धार्मिक स्थळांचा विकास या माध्यमातून ग्रामीण भाग अधिक सक्षम करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्ता राखत कामे वेळेत पूर्ण करण्यावरही आपण कायम भर दिला असून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील समाधानातच माझ्या राजकीय व सामाजिक वाटचालीची फलश्रुती दडलेली आहे.

यावेळी जयसिंगराव कर्डीले, आरपीआय पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे, अशोक कर्डीले सर, दशरथदादा कुलाळ, विकास पवार, संतोष डोंबाळे, अर्जुन रासकर, बाबासाहेब कोतकर, मधुकर उबाळे, रघुनाथ भोसले, गौतम गायकवाड, सुधाकर उबाळे, कैलास उबाळे, नंदुशेठ खामकर, कैलास कोठावळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामांमुळे कुरुंद गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार असून, आमदार दाते सरांच्या समाजाभिमुख कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्यांमध्ये विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version