पारनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि प्रचंड विजयाचे पडसाद आज पारनेरमध्ये उमटले. पारनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने या विजयाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य चौकात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

     यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘भारतीय जनता पक्ष विजय असो’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राज्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर जनतेने महायुतीला दिलेला हा कौल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

  नेत्यांचे मानले आभार….
या अभूतपूर्व विजयाबद्दल पारनेर भाजपच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. नामदार देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विजय चौधरी साहेब, रविजी अनासपुरे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या नेत्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि नियोजनामुळेच महायुतीला हे यश संपादन करता आले, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

  विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब…
या प्रसंगी बोलताना भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे म्हणाले की, “राज्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर विश्वास दाखवला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासह राज्यात भाजपने आपली ताकद सिद्ध केली आहे. हा विजय आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारा ठरेल.”

     या जल्लोष कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, मा.जि.प. वसंतराव चेडे, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक युवराज पठारे, सुनील म्हस्के, लहू भालेकर, कल्याण थोरात, सखाराम औटी, अर्जुन नवले, कानिफनाथ ठुबे, रमेश गाडगे, संतोष सातपुते, कांतिलाल बोरुडे, मनोज गंधाडे, राजेश चव्हाण, बाबू ठुबे, सुजित मुळे, पारनेर तालुक्यातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version