“जनतेचा प्रश्न, आमची जबाबदारी!” – दत्ता नाना पवार व राहुल दादा शिंदे पाटील यांची ठाम भूमिका
पारनेर /प्रतिनिधी :-पारनेर तालुक्यातील मुंगशी गावात दररोज रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे परीक्षा काळात मोठे नुकसान होत असल्याने तसेच परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर प्रवीण करपे यांनी संबंधित विभागाकडे ठाम मागणी करत लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सहाय्यक अभियंता पिसाळ साहेब यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ लाईट सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे रात्री ६ ते १० या वेळेत होणारी लोडशेडिंग बंद करण्यात आली आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राहुल दादा शिंदे पाटील व दत्ता नाना पवार यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला .
🔶🔶🔶🔶🔶
“मुंगशी गावातील ६ ते १० या वेळेतील लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास होत होता. आम्ही तात्काळ वीज विभागाकडे पाठपुरावा केला आणि ही लोडशेडिंग बंद करण्यात आली. जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच पुढे राहू.
-राहुल पाटील शिंदे. (भाजप तालुका अध्यक्ष.)
🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्रामस्थांच्या अडचणी आम्हाला मान्य नव्हत्या. रात्रीच्या लोडशेडिंगमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
– दत्ता नाना पवार
मुंगशी येथील लोडशेडिंग संदर्भात निवेदन देताना राहुल पाटील शिंदे – भाजप तालुका अध्यक्ष,दत्ता नाना पवार,मनोज मुंगसे – सरपंच डॉ. विलास काळे – सरपंच,अनिल दिवटे,प्रशांत करपे,सुनील नलगे,शुभम गाडेकर उपस्थित होते.
