कृष्णकृपाकिंत भागवताचार्य डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या वाणीतून भक्तिमय वातावरण
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वासुंदे येथे सध्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ह.भ.प. डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या सखोल, अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण कथनाने भाविक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले आहेत.
या सोहळ्याचे निमित्त आहे श्री भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी आणि अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव. वै. गुरुवर्य पंडित महाराज उंबरेकर, वै. दत्तात्रय महाराज राऊत यांच्या कृपा आशीर्वादाने व ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, रमेश महाराज कुलकर्णी, धनंजय महाराज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह प्रमुख सुजितराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद् भागवत कथा यांचा समावेश आहे. २७ जानेवारी रोजी मंगळवारपासून सुरू झालेला हा सोहळा ५ फेब्रुवारी गुरुवार रोजी डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे.
कथाव्यासपीठावर डॉ. मिसाळ महाराजांचे रसाळ वाणी, विविध धर्मग्रंथांचा गाढ अभ्यास, पौराणिक संदर्भ, दृष्टान्त आणि ओघवती शैली यांचा सुंदर संगम दिसतो. संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि मुखोद्गत श्रीमद् भागवत यामुळे श्रोत्यांचे मन सहज हरपले जाते. त्यांना साथ देताना ह.भ.प. राजेश्वरानंद महाराज कुऱ्हे (टाळ गायनाचार्य), ह.भ.प. गंगाधर महाराज झाडे (सिंथेसायझर), ह.भ.प. सोमनाथ महाराज यशवंते (तबला) आणि चंद्रकांत महाराज वायाळ यांचे सुमधुर गायन, भजन व गवळण कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनवत आहेत.
हा संपूर्ण भक्ती सोहळा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न होत आहे. रविवारी श्रीकृष्ण जन्म सोहळ्यादरम्यान स्थानिक कलाकारांनी सादर केलेला प्रसंग डोळ्याची पारण फिटणारा ठरला, ज्याने उपस्थित भाविकांमध्ये उत्साह अधिक वाढवला.
या ज्ञानयज्ञामुळे वासुंदे येथे भक्ती आणि ज्ञानाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे.
सप्ताह प्रमुख सुजित झावरे पाटील, यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव पाटील, सुदेश झावरे पाटील, गुरुदत्त पतसंस्था चेअरमन बा. ठ. झावरे, सरपंच विमल झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, शरदराव पाटील, रणजीत पाटील, माजी उपसरपंच शंकरराव बर्वे, भागूजीदादा झावरे, जोगेश्वरी पतसंस्था चेअरमन जालिंदर वाबळे, भाऊ सैद, श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्था चेअरमन बाळासाहेब कि. झावरे, दिलीप पाटोळे, पोपटराव साळुंके, मारुती उगले, बापूसाहेब गायखे, चेअरमन सूर्यभान भालेकर, पो. मा. झावरे, लक्ष्मण झावरे, नारायण झावरे, रा. बा. झावरे, बबनराव गायखे सर, अंबादास झावरे, इंजि. प्रसाद झावरे, रामचंद्र झावरे सर, लहानु झावरे, रभाजी झावरे, बाळासाहेब भालके सर, विलास साठे सर, इंजि. अनिल साळुंके, भिकाजी झावरे, अशोक चेमटे सर, संपत झावरे, शिवाजी बा. झावरे, पी. डी. बर्वे, पा. ल. बर्वे, सुभाष शिंदे, रामदास झावरे, पोपटराव हिंगडे, विठ्ठल झावरे, विकास झावरे, सुरेश शिंदे, मधुकर बर्वे, किसन वाबळे, खंडू टोपले, भिमाजी गायखे, भाऊसाहेब जगदाळे, धोंडीभाऊ मधे, बाबाजी ठा. ठुबे, इंजि. सुनील दाते, भाऊसाहेब हिंगडे सर, दिलीप उदावंत, बाळासाहेब वाबळे, साहेबराव गुंजाळ, योगेश चेमटे, पंढरीनाथ गांगड, भास्कर हिंगडे सर, शिवाजी गायखे, निवृत्ती बर्वे, भाऊसाहेब साळुंखे, संग्राम झावरे सर, प्रवीणकुमार झावरे सर, संजय झावरे सर, डॉ. उदय बर्वे, अविनाश गांगड, गणेश शिरतार, सोन्याबापु बर्वे, गजानन झावरे, भाऊसाहेब झावरे, पोपट मा. चेमटे, शांताराम झावरे सर, बबन तळेकर गुरुजी, दत्तात्रय बर्वे, बबनराव गांगड, पत्रकार शरद झावरे, महादू भालेकर, दादा भालकेर, बाळासाहेब पो. वाबळे, राजेंद्र नि. शिर्के, पांडुरंग दा. दाते, संभाजी शिर्के, नितीन बर्वे, उद्योजक दत्तात्रय साळुंके, अमोल उगले, इंजि. संजय साळुंके, अभिषेक बर्वे, दादा झावरे, बंडू जगदाळे, विलास हिंगडे, सुदाम भालके, कृष्णा वाबळे, संतोष राजापुरे, प्रदीप वाकचौरे, अभय वाकचौरे, संतोष क्षिरसागर, स्वप्निल बा. झावरे, कॉन्ट्रॅक्टर संतोष दाते, अशोक खराबी, सदाशिव झावरे, इंजि निकील दाते, गणेश आ. झावरे, तुकाराम भि. झावरे, साहेबराव गुंजाळ, सचिन सैद, अमोल पोटघन, राहुल गायखे, डॉ. बाबासाहेब गांगड, मनोज झावरे, दत्तात्रय जगदाळे, वैभव बर्वे, संदेश झावरे, कैलास सैद, सोमनाथ झावरे, गणेश बर्वे, सागर साळुंके, अरुण वाबळे, सचिन उगले, सुहास वाबळे, राजेंद्र शिर्के, दिलीप बर्वे, दशरथ बर्वे, भास्करनाना झावरे, नानासाहेब झावरे सर, आबाजी वाळुंज, शिवाजी आ. झावरे, गोरख दाते महाराज, किरण पोपळघट, अरुण चेमटे, शांताराम दाते, शांताराम साठे, संग्राम दाते, अतुल दाते, नारायण बर्वे, सुनील पानमंद, सतीश हिंगडे, मारुती दाते, अमोल साठे, अमोल शिंदे सर, वसुदेव साळुंखे सर, वैभव सोनवणे, संभाजी बर्वे, वैभव ग. झावरे, गजानन जगदाळे, किसन जगदाळे, बबन हिंगडे टेलर, कैलास दाते सर, शरद हिंगडे, संतोष हिंगडे, अक्षय हिंगडे, महेश झावरे, किरण गायखे, अभिनव पाटोळे, शरद सैद, संदीप ठुबे, समीर कंदलकर, तसेच श्री. भाऊसाहेब महाराज वारकरी मंडळ वासुंदेकर ग्रामस्थ गावातील सर्व तरुण मित्र मंडळ व महिला भगिनी यांच्या नियोजनाखाली भागवत कथा उत्सव व सप्ताह सुरू आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चेमटे सर करत आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶
श्री क्षेत्र वासुंदे येथे भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ यांची भागवत कथा सुरू असून या कथेचा लाभ पारनेर तालुक्यातील व परिसरातील भाविकभक्त घेत असून कथा यज्ञ मध्ये भाविक भक्त मोठ्या आनंदमय वातावरणात सहभागी होत आहेत. हा कथा सोहळा धार्मिक उत्साहाने व आनंदाने साजरा होत आहे.
– सुजितराव झावरे पाटील ( सप्ताह प्रमुख श्रीक्षेत्र वासुंदे)
