कासारे येथे उद्योजक धनंजय निमसे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न


पारनेर/प्रतिनिधी :
राजकारण समाजकारण करत असताना उद्योग व्यवसाय पाहून या क्षेत्रात तरुणांनी पाऊल ठेवले पाहिजे. कासारे गावचे असलेले भूमिपुत्र व सध्या मुंबईसारख्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून काम करत असलेले धनंजय निमसे हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तींची राजकारणात समाजकारणात गरज आहे. यापुढे राजकारण करत असताना त्यांना योग्य वेळी संधी दिली जाईल आशा सुसंस्कृत युवकांची भविष्य काळातील सामाजिक राजकारणात गरज आहे असे मत आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील कासारे गावचे भूमिपुत्र व सध्या ट्रान्सपोर्ट उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मुंबई येथे कार्यरत असलेले उद्योजक गोवर्धन उर्फ धनंजय निमसे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या मूळ गावी कासारे येथे मोठ्या दिमाखदार पद्धतीने पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कासारे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना नेते उद्योजक धनंजय निमसे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमा निमित्ताने पारनेर तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार काशिनाथ दाते यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, नगरसेवक पै. युवराज पठारे, नगर सह्याद्री संपादक शिवाजी शिर्के, माजी सरपंच शिवाजी खिलारी, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, हरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास शिंदे, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज करखिले, वडनेर हवेली सरपंच लहू भालेकर, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष सासवडे, बबन शिर्के, भाजप नेते संतोष शेलार, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, ऍड बाबासाहेब खिलारी, प्रगतिशील शेतकरी विकास रोकडे, अमोल रोकडे, माजी सरपंच धोंडिभाऊ दातीर, संजय आहेर, पोपट चौधरी, शिवसेना नेते संतोष साबळे, परसराम शेलार, अशोक खैरे, अण्णासाहेब पवार, महिला नेत्या वंदनाताई घोलप, कर्जुले हर्या सरपंच सुनीताताई मुळे, शकुंतला पवार, देवराम मगर, ग्रामविकास अधिकारी संपत दातीर, शिवसेना नेते पंढरीनाथ उंडे, मिनीनाथ शिर्के, युवा नेते अक्षय गोरडे, प्रसाद कर्णावट, ऍड. संतोष वाळुंज, युवा नेते गोपी घुले, दत्तात्रय घुले, युवा नेते राहुल घुले, महेश गुंजाळ, सरपंच शिवाजी निमसे, प्रकाश राजदेव, अनिकेत देशमाने, माजी सरपंच भाऊसाहेब आहेर, माजी सरपंच रोहिणी पानमंद, भाऊ खरात, सामाजिक कार्यकर्ते वसंत दातीर, उद्योजक अजित निमसे, मधुकर बर्वे सर, सुनील निमसे, राजेंद्र खरात, गोकुळ निमसे, निलेश चिकणे, अविनाश गोडसे, डॉ. जयवंत निमसे, जयवंत पानमंद, डॉ. अविनाश शेलार, निलेश पवार, शिवम पवार, स्वप्निल काशीद, जयसिंग आहेर, मंगेश सालके, बाबासाहेब रेपाळे, उद्योजक संतोष चौगुले, सुनील तांबोळी, प्रदीप चौधरी, सुनील गुंजाळ, रंगनाथ दाते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात धनंजय निमसे यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार मानले. कासारे गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. हा सोहळा गावकऱ्यांसाठी एक उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी प्रसंग ठरला.
🔶🔶🔶🔶🔶🔶
उद्योग, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करत असताना यापुढील काळात कासारे गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. राजकारणात समाजकारणात काम करत असताना समाजहित जोपासणार असून यापुढील काळात सक्रिय राहणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्या वाढदिवस अभिष्टचिंतनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे मी ऋण व्यक्त करतो.
– धनंजय निमसे (उद्योजक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version