वटसावित्री उत्सवातून पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश
कासारे / विशेष प्रतिनिधी,
भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जाणारा ‘वटपौर्णिमा’ सण आज टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील कासारे गावात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटसावित्री उत्सव, वृक्षलागवड आणि शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे वाटप कार्यक्रम टाकळी ढोकेश्वर गटाच्या नेत्या सोनियाताई राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या लोकप्रिय नेत्या सोनियाताई राजदेव यांनी कासारे येथे आवर्जून भेट दिली आणि वटपूजनासाठी जमलेल्या सर्व सुवासिनी महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी वटवृक्षाची विधीवत पूजा केली. या पारंपारिक सोहळ्यात सोनियाताई राजदेव यांनी सहभाग घेत महिलांचा उत्साह वाढवला. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता, सोनियाताईंनी गावातील महिलांसोबत आस्थेने संवाद साधला. त्यांनी महिलांच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
सोनियाताई राजदेव यांनी थेट गावात येऊन सणाच्या दिवशी आपुलकीने विचारपूस केल्यामुळे कासारे येथील महिलांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला.
यावेळी सोनियाताई राजदेव यांनी आपल्या मनोगतातून महिलांचे समाजातील महत्त्व आणि कुटुंबाप्रती असलेले त्यांचे समर्पण यावर भर दिला. त्यांच्या या साधेपणाचे आणि जनसंपर्काचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना सोनियाताई राजदेव म्हणाल्या की, “महिलांनी केवळ चूल आणि मूल या चौकटीत न राहता स्वावलंबी बनले पाहिजे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे. आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात महिलांना समान संधी व प्राधान्य मिळणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःसाठी जगण्याचा निर्धार केला पाहिजे.”
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचे वाटप करून शेती विकासासाठी प्रोत्साहन देण्यात आले. महिलांनी वटसावित्री पूजन करून पारंपरिक संस्कृती जपत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले पाहिजे. आजच्या काळात महिलांना समान संधी आणि प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने स्वतःसाठी जगण्याचा आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला पाहिजे.”
– सोनियाताई राजदेव,
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव होते. तसेच कासारे गावचे उपक्रमशील सरपंच सरपंच शिवाजीराव निमसे, कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तुळशीराम लगड, माजी मुख्याध्यापक पोपट नरड, बाळासाहेब नरड सर, माजी सरपंच शंकरराव घनवट, बापू दातीर, कृषी अधिकारी देवराव नवले साहेब, तुकाराम साळवे, गोकुळ निमसे, तुकाराम पानमंद, सखाराम नरड तसेच महिलांमध्ये मीरा निमसे, ज्योती घनवट, सुजाता दाते, स्वाती कासुटे, कमल घनवट, छाया लगड, पारूबाई घनवट, मीराबाई दातीर, शितल दातीर, जया कासोटे, रूपाली दातीर, सुरेखा दातीर, तारामती दातीर, जनाबाई आहेर, जनाबाई नरड, शारदा गुंड, रंजना नरड, रताळ नरड, छाया लगड इंदुबाई दातीर, श्वेता कासोटे, सुशाबाई दातीर, शोभा दातीर, विठाबाई कासुटे, कृतिका दातीर, पूजा लगड, झुंबर नरड, कांता नरड, सविता नरड, जानकाबाई नरड, जाईबाई वाव्हळ, अनिता लगड, सिंधुबाई लगड, पुष्पा लगड, श्रुतिका दातीर, ताई दातीर, माधुरी नरड, मीनाक्षी नरड, रत्नाबाई नरड, ऐश्वर्या दातीर, मीराबाई दातीर, झुमराबाई दातीर, नंदाबाई दातीर, गौतमी साळवे, शिल्पा गायकवाड, लक्ष्मी साळवे, जानवी साळवे, छाया नरड, अनुसया नरड, सरिता दातीर, संगीता पानमंद, संगीता दातीर, रोहिणी उमाप, कांता साळवे, सुनिता साळवे, पुष्पा खरात पारवाई पानमन लहानुबाई खरात, भागुबाई खरात, इंदुबाई खरात, सुरेखा पानमंद, कमल खरात, कौसाबाई नरड, रोहिणी निमसे, शकुंतला नरड, अनुसया नरड, वैशाली लगड, पूनम निमसे, अलका निमसे, मुक्ता निमसे, विमल कासुटे, मनीषा नरड, गंगुबाई अनंत, हिराबाई कासुटे, आशा जातीर, उषा दाते, कमल निमसे, राणी शिंदे, सुनीता दातीर, मीराबाई दाते यांच्यासह गावातील सर्व बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट नरड यांनी केले तर आभार गोकुळ निमसे यांनी मानले.




