कासारे, प्रतिनिधी :
कासारे ग्रामपंचायत, सर्व महिला बचत गट आणि शेतकरी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वटपौर्णिमा उत्सव २०२६ चे आयोजन सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. या पवित्र व सांस्कृतिक कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता वृक्षारोपणाने होणार असून, त्यानंतर १०.३० वाजता बियाणे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११.०० वाजता हळद-कुंकू समारंभ व वटवृक्ष पूजन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार असून, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




