पारनेर / भगवान गायकवाड,
श्रीनाथ शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मधुकर सयाजी चेडे यांच्याकडून शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
इयत्ता दहावी सन २००१ चा माजी विद्यार्थी मधुकर सयाजी चेडे या विद्यार्थ्याकडून विद्यालयातील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, स्कूल ड्रेस, तसेच शालोपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले. माजी विद्यार्थी मधुकर चेडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेतले त्या विद्यालयाचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून ११,०००/.. रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले. या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी संतोष जाधव यांनी केले याप्रसंगी श्रीनाथ शिक्षण संस्थेचे सचिव मोहन रेपाळे, विश्वस्त तुषार सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ आवारी, सरस्वती जावळे, स्मिता चव्हाण, मीरा पुजारी, देवराम दुश्मन, संतोष उमाप, स्नेहल मखरे, आदी शिक्षक उपस्थित होते. या बॅचचे मधुकर चेडे, संतोष जाधव, उत्तम रेपाळे, विश्वनाथ चेडे, गणेश रेपाळे, सुभाष चेडे, आकाश बोरुडे, हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक रामनाथ आवारी यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर मीरा पुजारी यांनी यापूर्वीच याच बॅचने विद्यालयासाठी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमांमध्ये स्मार्ट ब्लॅक बोर्ड, पेन, शाही व डस्टर देऊन शाळेत मदत केल्याबद्दल कौतुक करून यापुढील काळात शाळेला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आभार सरस्वती जावळे यांनी मानले.
