पारनेर/प्रतिनिधी : 
  खडकवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी धोंडीभाऊ कारभारी शिंगोटे आणि व्हा. चेअरमनपदी मिराबाई भागचंद हुलावळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक मंडळातील विश्वनाथ ढेकळे, शरद गागरे, बाबासाहेब आग्रे, सोमनाय गागरे, भागा हुलावळे, शिवाजी शिंगोटे, चेतन गागरे, संतोष ढोकळे, महादु गागरे, शिवा हुलावळे आणि विठ्ठल बिचारे उपस्थित होते.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत सोसायटीच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. धोंडीभाऊ शिंगोटे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मिराबाई हुलावळे यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. उपस्थित मान्यवरांनी नव्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवत गावाच्या समृद्धीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version