विरोली-हत्तलखिंडी ते पुणेवाडी जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पारनेर / ता. प्रतिनिधी  

सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला नवी गती देत आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२५- २६, लेखाशिर्ष ३०५४ मार्ग व पुल अंतर्गत विरोली- हत्तलखिंडी ते पुणेवाडी, रामा-६९ (इजिमा १९४) जोडरस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २० लक्ष कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार दाते सरांचे चिरंजीव उद्योजक दिलीप दाते यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या शुभहस्ते पार पडला.

ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होऊन शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने या कामाकडे परिसराचे विशेष लक्ष लागले होते. रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे वाहतूक सुलभ होऊन आर्थिक व सामाजिक घडामोडींना चालना मिळणार आहे.

यावेळी उद्योजक दिलीप दाते, राजु औटी, किसन बुचूडे, रामदास शेळके, हनुमंत शेळके, विलास शेळके, बबन शेळके, उत्तमराव गायकवाड, दिनकर गायकवाड, साहेबराव गायकवाड, वसंत गायकवाड, ज्ञानदेव शेळके, प्रदीप शेळके, विकास साळवे, किरण (पप्पू) आतकर, सागर साळवे, जयसिंग गायकवाड, सपंत शेळके, दिनेश गायकवाड, किसन गायकवाड, सूर्यभान ठुबे, भाऊ आंबेडकर, विलास शेळके, ज्ञानदेव केशव शेळके, विलास जयवंत शेळके, बाबासाहेब शेळके (ग्रा. सदस्य), बाळू शेळके, बबन शेळके, भाऊसाहेब शेळके, ठकाराम रेपाळे, संतोष रेपाळे, मंजाभाऊ शेळके, पंढरीनाथ शेळके, दिलीप शेळके, अभिजित आतकर आदी हात्तलखिंडी गावचे ग्रामस्थ तसेच ठेकेदार नागेश रोहकले उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड म्हणाले की, “आमदार काशिनाथ दाते सर म्हणजे जनतेच्या इच्छा-आकांक्षांना आकार देत विकास साकार करणारे नेतृत्व आहे. महिलांचे सक्षमीकरण, उद्योगांना गती आणि बळीराजाला बळ देत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया त्यांनी रचला आहे. सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विकास त्यांच्या माध्यमातून साकार होत आहे.”

या कामाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला आणखी एक बळकटी मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार दाते सरांच्या पुढाकारातून मतदारसंघात विकासकामांची मालिका सातत्याने सुरू असून त्यातून सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 संबंधित जोडरस्ता हा केवळ दळणवळणाची सुविधा नसून ग्रामीण विकासाची जीवनवाहिनी आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुलभ व सुरक्षित प्रवास मिळावा, हीच आमदार काशिनाथ दाते सरांची भूमिका आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून भविष्यातही अशी कामे प्राधान्याने राबवली जातील. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाची गती कायम ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.
– उद्योजक दिलीप दाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version