पारनेर : ता. प्रतिनिधी 

सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ ढवळपुरीत सव्वाकोटीहून अधिक विकासकामांचे आमदार काशिनाथ दाते सरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार काशिनाथ दाते यांच्या पुढाकारातून विविध शासकीय योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांना त्यांच्याच शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला.

मंजूर कामांमध्ये श्री दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ४० लाख रुपये, विविध वस्तीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, तांडा वस्ती सुधार योजनेतील कामे, स्मशानभूमी शेड बांधकाम व सुशोभीकरण, पाणीपुरवठा सुविधा, पेव्हर ब्लॉक बसविणे, सभामंडप बांधकाम तसेच सार्वजनिक स्वच्छता सुविधांसाठी प्रत्येकी ७ ते १५ लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध लेखाशिर्षांतून मंजूर झालेल्या या कामांमुळे ढवळपुरीच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, उपसरपंच बबनराव पवार सर, चेअरमन भागाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप थोरात, संतोषशेठ चौगुले, सुधाकर गावडे, पोपटराव चौधरी, गोविंद कुटे, रावसाहेब चौधरी, देवीदास फलके, लिंबाशेठ चौधरी, संतोष बुचूडे, दादा पाटील थोरात, बाबाजी चौधरी, हरीभाऊ वाळुंज सर, भालेराव सर, अजित सांगळे सर, शिवाजी चितळकर यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दाते सर भावूक होऊन म्हणाले, “आज मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविताना आदरणीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाची प्रकर्षाने आठवण येते. कितीही कठीण आणि असाध्य वाटणाऱ्या प्रश्नांवर दादांच्या नेतृत्वाखाली सहज मार्ग निघायचा. कोणतीही अडचण त्यांच्या ध्येयापेक्षा कधी मोठी ठरली नाही. सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याची त्यांची जिद्द आणि धैर्य हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे.”

🔶🔶🔶🔶🔶🔶
 विकासाची गंगा गावागावात पोहोचवणारे, शब्दांपेक्षा कृतीतून विकास घडवणारे नेतृत्व, जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे विकासपुरुष, रस्ते, पाणी, शिक्षण – सर्वांगीण विकासाची दिशा, जनतेच्या स्वप्नांना आकार देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व, काम बोलते… आणि काम म्हणजे आमदार काशिनाथ दाते सर, मंजूर झालेली ही कामे ढवळपुरीच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. अजितदादांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ढवळपुरी गावाचा विकासाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प पूर्णत्वास नेत आहेत. 

वसंतराव चेडे, माजी जि.प. सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version