पारनेर / प्रतिनिधी, 
      पारनेर तालुक्यातील मौजे दरोडी येथील प्रसिद्ध दर्ग्या शेजारील डोंगरावर असलेले महाकाय आणि धोकादायक दगड तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांची व भाविकांची होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

      निवेदनात असे म्हटले आहे की, सदर दर्ग्याला अनेक भाविक भेट देत असतात. हा दर्गा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला असून डोंगराशेजारी लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. जोरदार पाऊस किंवा भूस्खलन झाल्यास हे दगड खाली घसरून दर्ग्याच्या परिसराला, आजूबाजूच्या वस्तीला आणि रहदारीच्या रस्त्याला मोठा धोका(माळीण सदृश्य) निर्माण होण्याची शक्यता आहे. दगड खाली आल्यास मोठी जीवित वित्त हानी होण्याची भीती आहे. याआधीही याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे सदर ठिकाणची पाहणी करून लवकरात लवकर आपल्या पातळीवरून संबंधितांना योग्य ते निर्देश देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version