यूपीएससी उत्तीर्ण अभिजीत आहेरचा पळसपुर येथे सत्कार 

पारनेर/प्रतिनिधी : 
ग्रामीण भागातील तरुणपिढीने शासकीय सेवेत यश मिळवून गावाचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. अभिजित आहेर यांनी मेहनतीने आणि चिकाटीने मिळवलेले हे यश सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशा यशस्वी प्रवासाने ग्रामीण भागातील इतर तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ मिळेल. अभिजित यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले. 

पारनेर तालुक्यातील पळसपुर येथे भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेच्या आदर्श विद्यालय व पळसपुर ग्रामस्थ यांच्या वतीने कु. अभिजित सहदेव आहेर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत भारतीय वन विभाग, भारतीय महसूल सेवा आणि भारतीय गुप्तचर विभागात निवड होऊन अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभाला प्रा. सहदेव आहेर, भास्कर ढोले, महादू आहेर, मयुर शिंदे, सुरेश आहेर, बाबू आहेर, विजय आहेर, श्रीकांत वाघमारे, अभय आहेर, विक्रम आहेर, संजय आहेर, बळवंत आहेर, कोंडीभाऊ आहेर, रामदास ढोले, रावसाहेब अडसरे, भानुदास आल्हाट, बाळशिराम सोनवणे, बबन महादू आहेर, नामदेव ढोले, किसन काकडे, हनुमंत पवार, सतीश आहेर, पंकज आहेर, अशोक आहेर, विठ्ठल आहेर, हौशीराम आहेर, अक्षय आहेर, भाऊसाहेब आहेर पाटील, रखमा आहेर, रोहन आहेर आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एस के जाधव यांच्यासह विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित यांच्या यशाने गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्या या यशाने इतर तरुणांनाही प्रेरणा मिळाली आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
प्राथमिक शिक्षण हाच खऱ्या अर्थाने केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा पाया आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यशस्वी होणे अवघड नाही यापुढील काळात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असल्यास मार्गदर्शन करण्यास व आर्थिक पाठबळ देण्यास तयार आहे. 
कु. अभिजीत आहेर (यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version