अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

 महिला आणि मुलींचा पाठलागातून उद्भवणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांबाबत भारतात प्रथमच एका महत्वपूर्ण कार्यशाळेचे उद्या अहिल्यानगर येथे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ॲड.विजया रहाटकर, तेलंगणातील प्रज्वला संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री डॉ. सुनिथा कृष्णन, विधीज्ञ शिरीन मर्चंट, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत ,महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महिला सुरक्षा विभाग प्रमुख सौ. अस्वाती दोर्जे , फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधील प्रा. कामोद खराडे , इंग्लंड मधील महिलांचा पाठलाग आणि लैंगिक अत्याचार या विषयातील तज्ञ श्रीमती कँरोलीन हॉर्नसबी, आशयसंपन्न चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या आणि सत्यमेव जयते या टीव्ही मालिकेच्या संशोधन विभाग प्रमुख स्वाती भटकळ, आदी कार्यशाळेत सहभागी होणार असल्याचे स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, खजिनदार गीता कौर यांनी दिली.
राष्ट्रीय महिला आयोग आणि स्नेहालय यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 



अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे उद्या दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ॲड.रहाटकर यांच्या बीजभाषणाने कार्यशाळेचा आरंभ होईल. यावेळी महिलांचा पाठलाग ,या विषयावर स्नेहालयाने बनवलेली चित्रफीत प्रकाशित केली जाईल. उद्घाटनाचे सत्र सर्वांसाठी खुले असेल.

15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता समारोपाचे सत्र होई, असे संस्थापालक राजीव गुजर, अनिल गावडे आणि हनीफ शेख यांनी नमूद केले..


 महिला हक्क रक्षणासाठी काम करणाऱ्या 150 संस्था तसेच विधि महाविद्यालये यात सहभागी झाले असल्याचे स्नेहाधार प्रकल्पाचे संचालक ॲड.शाम आसावा आणि समन्वयक विद्या घोरपडे यांनी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version