हा केवळ एक स्थापत्य प्रकल्प नसून भक्ती व ज्ञान यांचा अनोखा संगम आहे – प्रा.राम शिंदे

अ.नगर / प्रतिनिधी, 
अहिल्यानगर येथील डॉ. कांकरिया यांच्या साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये ‘शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम’ प्रकल्पाचे शानदार उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा भवन पुणे येथील राजयोगी दशरथ भाई, मिरा सोसायटी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी उषा दिदी, अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगीनी राजराजेश्वरी दिदी, बी के डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते.

हा उपक्रम केवळ एक स्थापत्य प्रकल्प नसून भक्ती व ज्ञान यांचा अनोखा संगम आहे, प्रेरणादायी आध्यात्मिक प्रकल्प आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये सर्वांनाच मन:शांतीची अत्यंत गरज आहे. खरी मनाची शांती भौतिक बाबीमध्ये नसुन ती आध्यात्मामध्ये आहे. हे मर्म जाणुन साईबन कृषी पर्यटन क्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. आत्ता पर्यंत अनेक क्रांती आपण पाहिल्या परंतू सध्या आध्यात्मिक क्रांतीची जगाला गरज आहे. यातुनच सकारात्मक परिवर्तन होऊ शकते. सामाजिक व वैश्विक शांतीसाठी आध्यात्माचा मार्ग उत्तम आहे असे प्रतिपादन प्रा. राम शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

सुरूवातीस शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम अंतर्गत बेलपानाने बनविलेले भव्य, सुंदर आकर्षक ज्योर्तिलिंग (महादेवाची पिंड) यांचे ओम् नमो शिवायच्या मंगल मधुर ध्वनीमध्ये मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. टॉवर ऑफ पीस-शांती स्तंभ तसेच परमात्मा शिवाचा यथार्थ परिचय (गीता ग्रंथाच्या आधारावर), राजयोगा मेडिटेशनची माहिती सांगणारे पोस्टर प्रदर्शन दालनाचे उद्घाटनही संपन्न झाले.

 सदर प्रसंगी बोलतांना बी के दशरथ भाई म्हणाले की काळ बदलतो आहे, अनेक प्रकारच्या समस्या आज आपल्या समोर उभ्या आहेत. ऋतुचक्र बदलत चालले आहे. वैज्ञानिक व सामाजिक तज्ञ मंडळी पण विनाशाचा इशारा देत आहेत. अशा वेळेस धैर्य व आत्मिक उन्नतीसाठी फक्त आध्यात्मच आपल्याला तारू शकेल म्हणूनच हे स्थान समाजाचे कल्याण करणारे, व्यक्तीला मन:शांती प्रदान करणारे आदर्श व उत्तम स्थान आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.


 सदर प्रसंगी राजयोगीनी उषा दिदी म्हणाल्या की, आज डॉ. सुधाताईंचा वाढदिवसही आहे. आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन 108 समर्पित ब्रह्माकुमारीज् सदर सोहळयास उपस्थित आहेत. हा केवळ योगायोग नसुन एक सुवर्णयोग आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त डॉ. सुधाताईंनी एक अनोखी आध्यात्मिक भेट समाजाला देऊ केली आहे. राजयोगीनी ब्रह्माकुमारी राजराजेश्वरी दिदींनी ‘शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम’ प्रकल्पा सोबतच मेडिटेशनची टेकडी, पीस पार्क, सृष्टी चक्र, मेडिटेशन हट, नक्षत्र उद्यान, शाश्वत यौगिक खेती, कल्पतरूह प्रकल्प, बोटींग, पपेट शो, राजयोगा मेडिटेशनची प्रदर्शनी आदिंचा ही लाभ पर्यटकांना मिळणार असुन एक सुखद आध्यात्मिक सहलीचा सर्वांनी आनंद घ्यावा असे त्यांनी सांगितले. सदर प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी’ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मेडिसीन बरोबर मेडिटेशनचाही डोस हृदय आरोग्यासाठी आवश्यक आहे. हे अधोरेखीत झाले.

 संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 27 वर्षांपूर्वी खडकाळ असलेल्या या जमिनीचे एम आय डी सी चे सांडपाणी वापरून पडिक जमिनीचा विकास करण्यात आला त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारही साईबनला प्रात्प झाला आहे. साईबन हे देशातील पहिले कृषी पर्यटन क्षेत्र आहे त्यामध्ये मेडिटेशन झोनचीही सुविधा ही मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो. हजारो पर्यटकांना याचा लाभ प्राप्त होत आहे. निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटतांना आध्यात्मिक यात्रेचीही अनुभुती सर्वांना इथे होते हे महत्वपूर्ण आहे. शिवस्तुती पर नृत्य मनस्वी कोरडे हीने सादर केले. तर सुत्रसंचालन मनिषा यंगल आणि बी के नरेश भाई यांनी केले. कार्यक्रमाची सांगता हुरडा पार्टी व वनभोजनाने झाली शेवटी डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version