पारनेर / ता. प्रतिनिधी, 

पारनेर-नगर मतदारसंघातील रस्ते व वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सरांनी घेतलेला पुढाकार निर्णायक ठरत असून, त्यांनी लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार मंत्रालय, मुंबई येथे आयोजित केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आमदार दाते सरांनी स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या देवीभोयरे फाटा, सुपा, सारोळा, खडकी रस्ता कामातील सुधारणां- संदार्भातील मागण्या ठामपणे मांडत प्रशासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले.

बैठकीत सुपा चौक ते MIDC चौक हा सबंधित प्रकल्पातून वगळला गेलेला भाग मे. चेतक एंटरप्राइजेस लि. यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्या भागाचे रुंदीकरणसह मुख्य कामासोबतच पूर्ण करण्याच्या केलेल्या मागणीवर झालेल्या चर्चेत सबंधित रस्ता मे. चेतक एंटरप्राइजेस लि.ने पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर पारनेर शहरातील पानोली चौक ते कान्हुर चौक दरम्यानचा भागही सबंधित प्रकल्पात समाविष्ट नसल्याचे व त्या रस्त्याची सुधारणा करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशित करत सबंधित काम पूर्ण करून देण्याचे मान्य केले.


याचबरोबर देवीभोयरे फाटा, सुपा, सारोळा, खडकी या रस्त्यावरील मौजे सारोळा कासार, ता. नगर येथे सबंधित प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक RUB (रेल्वे अंडर ब्रिज) ची मागणी व गरज आमदार दाते यांनी निदर्शनास आणून दिल्यावर मंत्री महोदयांनी नवीन RUB (रेल्वे अंडर ब्रिज) उभारण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम अधिकारी व रेल्वे सकारात्मकता दर्शवत पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातही सबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. 

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव राजभोज, सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग बोरसे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत भोये, पुणे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पैठणकर, सार्वजनिक बांधकाम मंडळ अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता म्हाळुंगे, सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगरचे कार्यकारी अभियंता जाधव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेरचे उपकार्यकारी अभियंता वसईकर तसेच चेतक एन्टरप्रायजेसचे भोसले, राजपथचे चव्हाण इ. अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांमध्ये समन्वय साधून ही कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना त्यांना यावेळी देण्यात आल्या.

आमदार काशिनाथ दाते सरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ठाम नेतृत्वामुळे पारनेर-नगर मतदारसंघाच्या विकासाला नवे बळ मिळत असून, यानिमित्ताने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले व नागरिकांची प्राधान्याने मागणी असलेले हे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर निर्णय होणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version