वासुंदे येथे दोन रोहीत्रांचे उदघाटन

पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे गावाचे क्षेत्रफळ जिल्ह्यातील मोठ्या गावांपेक्षा मोठे आहे, त्यामुळे गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत वीजपुरवठा पोहोचवण्यात अडचणी येत होत्या. सातत्याने उपाय शोधत असताना, आज दोन नवीन रोहीत्रांच्या उद्घाटनामुळे वीज जोडणी प्रत्यक्षात साकारली आहे. यामुळे गावातील वीज प्रश्नावर मोठा तोडगा निघाला आहे. असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या वासुंदे गावठाण येथे ६३ केव्ही ट्रान्सफार्मर तसेच बर्वे नगर येथील ६३ केव्ही ट्रान्सफार्मर लोकार्पण सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वासुंदे गावच्या सरपंच विमल झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, रणजीत पाटील, माजी उपसरपंच शंकर बर्वे, स्वप्निल झावरे, अंबादास झावरे, भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, बाळासाहेब झावरे, पी डी बर्वे, सोन्याबापू बर्वे, सुभाष बर्वे, प्रवीण झावरे, लक्ष्मण झावरे, पो. मा. झावरे, निवृत्ती बर्वे, शिवाजी बर्वे, बाबासाहेब बर्वे, रामदास बर्वे, दत्तात्रय गांगड, इंजि. निखिल दाते, मनोज झावरे, शांताराम झावरे, शांताराम साठे, विलास बर्वे, गणेश बर्वे, भाऊसाहेब बर्वे, दत्तात्रय बर्वे, संतोष वाबळे, पोपट हिंगडे, संतोष दाते, विशाल बर्वे, सुदाम भालके, भाऊसाहेब झावरे, ग्रामविकास अधिकारी भास्कर लोंढे, वायरमन पंकज वतपाळ आदी यावेळी उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
वासुंदे येथे असलेल्या रोहित्रानवर विजेचा लोड येत होता. त्यामुळे नव्याने दोन रोहित्रे सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले असून व ते कार्यान्वित झाले आहे त्यामुळे आता विजेचा प्रश्न सुटला आहे. 

शंकर बर्वे (माजी उपसरपंच, वासुंदे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version