पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील पाडळी येथील ब्रिटानिया डेअरीचे चेअरमन नितीन साठे यांनी स्वखर्चाने पाडळी देवदैठण रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. नितीन साठे यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले तर गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्याला जोडणारा व शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला माल मुख्य बाजारपेठ असलेल्या शिरुर, पुणे याठिकाणी नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. तसेच दुध उत्पादक शेतकरी, शाळेतील विद्यार्थी व सुपा औद्योगिक वसाहतीमधील कामगार यांना रात्री अपरात्री या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती, या ठिकाणी छोटे – मोठे अपघात देखील झाले आहेत. मात्र साठे यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी डी बी आण्णा करंजुले, पत्रकार दीपक करंजुले, विक्रम खेसे, पिनू महाराज साठे, सतीश साठे, श्रीराम करंजुले, किरण साठे, योगेश साठे, आदेश साठे, संजय (नाना) साठे, अशोक खेसे, सोनू साठे, अजित करंजुले, दादा साठे, बंडा भालेकर, आकाश साठे, किरण चव्हाण, ओम साठे आदी यावेळी उपस्थित होते.
