पारनेर / भगवान गायकवाड, 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवन बांधणी’ योजनेअंतर्गत नूतन बांधण्यात आलेल्या पानोली ग्रामपंचायत कार्यालयाचा (ग्रामसचिवालय) लोकार्पण सोहळा अहिल्यानगर-दक्षिणचे खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. 



    या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, डॉ. आबासाहेब खोडदे, सुभाष पाटील गाजरे, सरपंच संदीप गाडेकर, उपसरपंच अनुसया खामकर, तुकाराम वाखरे (ऐक्य सेवा सेंटर), माजी सरपंच शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच प्रशांत साळवे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.केवळ इमारतीचे उद्घाटनच नव्हे, तर गावाच्या कायापालटासाठी सुमारे १ कोटी ११ लाख रुपयांच्या शेतपांदण रस्ते व सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाड्या-वस्त्यांवरील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी दिगंबर काटे, तलाठी पोटघन, सोसा. व्हा. चेअरमन रामदास शिंदे, अविनाश शिंदे, भाऊसाहेब शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. नव्या ग्रामसचिवालयामुळे ग्रामस्थांना आता सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली आणि अधिक कार्यक्षमतेने मिळणार आहेत.

🔶🔶🔶🔶🔶
या निधी मुळे आणि नियोजित निधी मुळे आता गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील पोहचणे सुलभ झाले आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
    – संदिप गाडेकर, सरपंच, पानोली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version