पारनेर / भगवान गायकवाड, 
      पारनेर शहरातील संतोष सोबले आणि सुष्मित कोल्हे, यांनी हॉटेल व्यवसायिक क्षेत्रातही यशस्वी पदार्पण केले आहे. पारनेर येथील पारनेर-कान्हुर रोड, पाटाडी वस्ती या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या त्यांच्या ‘हॉटेल सार्थक’ या नूतन हॉटेलचा उद्घाटन सोहळा आज, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला.

    या व्यवसायाच्या शुभारंभासाठी सोबले आणि कोल्हे कुटुंबीयांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन न करता, हॉटेल सार्थकचे उद्घाटन या दोन्ही तरुण उद्योजकांच्या आदरणीय आई-वडिलांच्या शुभहस्ते करण्यात आले. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यात आला. हा क्षण उपस्थित सर्व मान्यवरांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एक भावनिक आणि आदर्शवत क्षण ठरला.हॉटेल सार्थकच्या उद्घाटन सोहळ्याला पारनेर आणि परिसरातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी संतोष सोबले आणि सुष्मित कोल्हे या तरुण उद्योजकांना त्यांच्या या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

संतोष सोबले व्यवसायाच्या माध्यमातून ते पारनेरवासियांना उत्तम सेवा देतील, असा विश्वास व्यक्त केला. संतोष सोबले आणि सुष्मित कोल्हे यांनी हॉटेल सार्थक हे केवळ एक भोजनालय न ठेवता, दर्जेदार सेवा, उत्तम स्वच्छता आणि चविष्ट भोजन यासाठी ओळखले जाईल, असा मानस व्यक्त केला आहे. पारनेर-कान्हुर रोडवरील पाटाडी वस्ती येथे हे हॉटेल सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना आणि प्रवाशांना एक नवा आणि उत्तम भोजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे .’हॉटेल सार्थक’च्या प्रशस्त जागेचे आणि आकर्षक सजावटीचे कौतुक केले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पार पाडण्यासाठी सोबले आणि कोल्हे कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version