स्पर्धा परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश; वाघुंडे बुद्रूकच्या लेकीचे सर्वत्र कौतुक
जागतिक महिला दिनी कर्तृत्वाचा सन्मान
पारनेर/प्रतिनिधी :
राज्य सरकारच्या नगररचना विभागाने घेतलेल्या लघुलेखक (वर्ग २) परीक्षेत पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथील मोहिनी संतोष रासकर राज्यात चौथ्या क्रमांकाने तर मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शेतकरी कुटुंबातील मोहिनी रासकरने वयाच्या २१ व्या वर्षी मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळवले.
जागतिक महिला दिनानिमित्त वाघुंडे बु. येथे मोहिनी रासकर हिचा राजेश्वरी दत्तात्रय दिवटे- कोठावळे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित चंद्रकला रासकर, साधना दिवटे, कल्पना पठारे, कल्पना गाडीलकर, शोभा गाडीलकर, पुष्पा गाडीलकर, साक्षी गडीलकर आदी उपस्थित होते.
माझ्या कुटुंबाने दिलेली प्रेरणा व साथ यामुळे मी हे यश मिळवले, असे मोहिनी रासकरने यावेळी सांगितले. कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल मोहिनी रासकरचे कौतुक होत आहे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाघुंडे बुद्रूक येथे मोहिनी रासकर हिचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजेश्वरी दत्तात्रय दिवटे- कोठावळे यांच्या हस्ते मोहिनीचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना मोहिनी रासकर भावूक झाली होती. ती म्हणाली, माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला जाते. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि खंबीर साथीमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. स्पर्धा परीक्षेत सातत्य ठेवले तर यश नक्की मिळते.
मोहिनीच्या या यशामुळे वाघुंडे बुद्रूक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
मोहिनीचे हे यश केवळ रासकर कुटुंबाचाच फक्त अभिमान नसून, वाघुंडे बुद्रुक गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असतानाही, वयाच्या २१ व्या वर्षी जिद्दीच्या जोरावर तिने राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, हे तिच्या कष्टाचे फळ आहे. मनात जिद्द असेल तर गगनभरारी घेता येते, हेच मोहिनीने सिद्ध केले आहे.
– राजेश्वरी दत्तात्रय दिवटे-कोठवळे
