इयत्ता पाचवी २० विद्यार्थी तर इयत्ता आठवी १७ विद्यार्थी

पारनेर / भगवान गायकवाड, 

         महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक परीक्षा सन २०२४-२५ मध्ये सुपा एमआयडीसी नजीकच्या गुरुदेव स्कूलचे तब्बल ३७ विद्यार्थी गुणवत्ता यादी झळकल्याने शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .या यशामुळे ही शाळा पारनेर तालुक्यात अव्वल ठरली आहे. या ३७ विद्यार्थ्यांमध्ये पाचवीचे २० तर आठवीच्या १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
         यामध्ये पाचवीचा समरजीत कल्याण लगड या विद्यार्थ्याने ३०० पैकी २७० गुण मिळवून अहिल्यानगर जिल्ह्यात पाचवा क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे. तर इयत्ता आठवीची कु. देवयानी संदीप दिवटे या विद्यार्थिनींने ३०० पैकी २५६ गुण मिळवून जिल्ह्यात चौथी येण्याचा मान मिळवला आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून आठवीसाठी ७००० रुपये व पाचवीसाठी ५००० रुपये शिष्यवृत्ती दरवर्षी प्राप्त होणार आहे.
         या यशाबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ढवळे, विस्तार अधिकारी शोभा मगर मॅडम, सुपा पोलीस स्टेशनचे पी.आय. सोमनाथ दिवटे, संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर सर, संस्थेचे सचिव सुभाष मगर, प्राचार्य तुषार कदम सर, पर्यवेक्षक मंगेश चितळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
      “एकच ध्यास गुरुदेव चा गुणात्मक विकास” या उपक्रमांतर्गत गुरुदेव शिक्षण संस्थेने इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांचे बाळकडू मुलांना दिले होते. त्यामुळे हे घवघवीत यश मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले. मुलांचा गुणात्मक विकास वाढल्याने शाळेचा संख्यात्मक विकास होत चालला आहे. या स्पर्धा परीक्षांमुळे शाळेचा यावर्षीचा पट ११०० झाला आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
गुरुदेवचा ग्रामीण भागात ठसा

 शिष्यवृत्तीचे ग्रामीण भागाचे मेरिट शहरी भागापेक्षा जास्त झाले आहे. ३०० पैकी २३२ ला मिरीट लागून देखील २० मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. तर इयत्ता आठवीचे मेरिट २०० हून अधिक असून देखील १७ मुले गुणवत्ता यादी झळकली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सोनाली पवार ताई, नीलम जाधव ताई, अश्विनी भोसले ताई, संभाजी मते दादा, समीना मोमीन ताई यांचे मार्गदर्शन लाभले.
  

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
सराव आणि सातत्य…

 या यशाबद्दल जिल्ह्यात चौथी आलेली देवयानी संदीप दिवटे म्हणाली शाळेमध्ये आमचे ६० ते ७० पेपर वेळ लावून सोडून घेण्यात आले होते व त्याचे स्पष्टीकरण करून घेण्यात आलं होतं, त्यामुळे आमचा खूप सराव झाला आणि या सर्वांमध्ये सातत्य असल्यामुळे आम्हालाही यश मिळाले.
 तसेच शाळेने सातारा, पुणे, नाशिक या वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप स्टडी मटेरियल आम्हास उपलब्ध करून दिले. – देवयानी दिवटे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व गुण –

समरजीत कल्याण लगड- २७०, साहिल नंदकुमार गाडेकर- २५८, तेजस्वी रवी कारले- २५८, समृद्धी सयाजीराव गुंड- २५६ ,श्रावणी दत्तात्रय तरटे- २५६,श्रेया राहुल मगर- २५२, रूपाली नवनाथ तरटे- २५०, समृद्धी सचिन कोठे- २४४, संस्कृती विवेक काळे- २४४, आराध्या बापू तांबे- २४०, प्रांजल सुभाष थिटे- २४०, आराध्या गणेश वाबळे- २३८, समीर गोविंदा तायडे- २३८, ईश्वरी अमित दिघे- २३६,
 रिया प्रमोद गाडीलकर-२३६, श्रावणी भरत मगर-२३४, सिद्धेश नंदकुमार रेपाळे- २३४, गौरी विजेंद्र फुलारे- २३२, सानवी सचिन गवळी- २३२.

 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व गुण 

देवयानी संदीप दिवटे- २५६, साक्षी राजेश शेळके- २५४,
 इशांत शरद शेळके- २५२, गौरव मंगेश गवळी- २४६,
 देवेश पोपट शिंदे- २४२, वैष्णवी गोपीनाथ खोले- २४०, साई दत्तात्रय डोईफोडे- २३८, स्वीकार रमेश येणारे- २३४, समीक्षा संतोष नवले- २३०, सार्थक श्रीकांत येणारे- २२८, राशी शैलेंद्रसिंग चौहान-२२६, सोहम कानिफ मगर- २२४, अलिजा जावेद शेख- २०८, युवराज भाऊसाहेब मगर- २०८, पौर्णिमा रघुनाथ इप्पर -२०६, साई विकास ठोकळ- २०४, साईनाथ बाळासाहेब पठारे- २०२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version