पारनेर / प्रतिनिधी, 
भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) राज्य परिषदेवर पारनेर तालुक्यातील निष्ठावंत नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. कोरडे यांच्या या निवडीमुळे पारनेर तालुक्याला दुसऱ्यांदा राज्यस्तरीय नेतृत्वाची संधी मिळाली आहे. 

विश्वनाथ कोरडे हे भाजपाचे तळागाळातील कार्यकर्ते ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत संपर्क असलेले पारनेर तालुक्यातील एकमेव नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही राजकीय लाभाच्या पदावर नसतानाही त्यांनी तालुक्यातील प्रलंबित विकासकामांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या या निवडीने निष्ठावंत कार्यकर्त्याला योग्य संधी मिळते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

बाभुळवाडे सारख्या ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विश्वनाथ कोरडे यांना सत्ताधारी पक्षाने दुसऱ्यांदा राज्य कार्यकारिणीवर निवडून मोठी संधी दिल्याने पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. ही निवड निष्ठा आणि समर्पणाला मिळालेला सन्मान असल्याचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


🔶🔶🔶🔶🔶🔶
 “पक्षाने यापूर्वीही मला राज्य कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली होती आणि आता पुन्हा ही जबाबदारी मिळाली आहे. मी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो. या संधीचे सोने करत पारनेर तालुक्यातील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून ती पूर्ण करेन आणि पक्षाच्या वाढीसाठी तळागाळापर्यंत काम करेन.”  
 :- विश्वनाथ कोरडे, भाजपा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य,महाराष्ट्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version