पारनेर / भगवान गायकवाड, 

        पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात पार पडला. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांची मनमोहक सादरीकरणे आणि मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन ऐक्य सेवा सेंटरचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतगीताने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात सांस्कृतिक पर्व रंगले.

        विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समाजप्रबोधनपर, देशभक्तिपर, शेतकरी गीतांबरोबरच विविध नृत्यनाटिका आणि बालगीते यांनी उपस्थितांचे मन भारावून टाकले. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांनी अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वाखारे साहेब यांनी मराठी शाळांचे संवर्धन हे काळाची गरज असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचे आवाहन केले.

          केंद्रप्रमुख माळी साहेब, माजी चेअरमन गोकुळ कळमकर, तसेच शिक्षक बँकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. सूत्रसंचालन आप्पासाहेब रसाळ व संतोष लगड यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले, तर आभार प्रदर्शन दुधाडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. धामणे सर, श्री. दरेकर सर, श्री. यादव सर, श्रीम. खेडकर मॅडम, सौ. गायकवाड मॅडम यांच्यासह गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग आणि पालकांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाची विशेष वैशिष्ट्य ठरली. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनार्थ ग्रामस्थांनी उदार हस्ते बक्षिसरूपी निधी देऊन शिक्षणप्रेमाचे उदाहरण घालून दिले.

          यावेळी सरपंच पूजाताई संतोष केकडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, मा. सरपंच भाऊसाहेब भोगाडे सर, चेअरमन अर्जुन रसाळ, व्हा चेअरमन सचिन रसाळ, माजी सरपंच अनिता भोगाडे, मा. उपसरपंच मोहन पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत गांगड, उपाध्यक्ष सौ. वृषाली रसाळ, माजी अध्यक्ष युवराज डोंगरे, शिक्षणप्रेमी बापू भोगाडे, अश्विनी भोगाडे, शिवाजी रसाळ, अर्जुन डोंगरे, स्वप्निल भोगाडे, गोवर्धन डोंगरे, अर्जुन गांगड, शेखर पवार, किरण भोगाडे, संतोष राजणे, रवींद्र भोगाडे, सागर रसाळ, दत्ता गरदारे, जालिंदर पवार, सोमनाथ तरटे, अनिकेत लगड, अक्षय नितीन पवार, राजेंद्र रसाळ, युवराज रसाळ, सागर रसाळ, अक्षय भोगाडे, सुधीर गायकवाड, शुभम गायकवाड, ऋषी पवार, नितीन भोगाडे, गणेश रसाळ, अनिकेत भोगाडे, नाना केकडे, अशोक सातपुते, योगेश सातपुते, मधुकर लगड, विवेक गायकवाड, अभिजित भोगाडे, अंगणवाडी सेविका उज्वला भोगाडे, मदतनीस सुरेखा रांजणे, गौरी सातपुते, जान्हवी पवार, प्रांजल तरटे, सुनंदा सातपुते, प्रियांका कामठे, अर्चना डोंगरे यांसह मोठया प्रमाणात ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
आजच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य बापूशेठ भोगाडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे गांगर्डा येथे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्यांच्यासाठी यावेळी बक्षीसे देण्यात आली. तसेच इतर विद्यार्थ्यांनी ही या परीक्षेतून आपला शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी प्रयत्न करावे.
   – उपाध्यक्ष वृषाली शेखर रसाळ, बापूशेठ भोगाडे, शिक्षणप्रेमी तथा सदस्य शालेय व्यवस्थापन समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version