पारनेर / भगवान गायकवाड,
आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या उद्देशाने पारनेर शहरातील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने संचालिका साधना दिदी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून थोर समाजसेवक व पद्मश्री पुरस्कार विजेते अण्णासाहेब हजारे यांना साधना दिदी यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. यावेळी मगर दिदी, राम भाई, सागर हांडे, किरण मगर, आवारी सर, एकनाथ औटी, बबन खोडदे यांच्यासह अनेक सेवेकरी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, पारनेर-अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते आणि भाजप नेते वसंतराव चेडे यांनाही ब्रह्मकुमारी साधना दिदी आणि हिराबाई मगर दिदी यांनी अतूट बंधनाची राखी बांधली. या प्रसंगी आवारी सर, एकनाथ औटी, राम भाई, बबन खोडदे यांच्यासह अनेक सेवेकरी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाद्वारे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाने सामाजिक एकता आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version