पारनेर | प्रतिनिधी
पारनेर मधील सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद ऋषी ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पारनेर-सुपा रोडवरील संभाजीनगर, पारनेर येथील हॉटेल लकी येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण कार्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमात स्नेहालय अंतर्गत उडान प्रकल्प पथनाट्य, अहिल्यानगर यांचा सहभाग असणार असून, ‘गाडी घुंगराची फेम’ विलास अटक यांचा गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास स्नेहालय उडान प्रकल्प, अहिल्यानगरचे व्यवस्थापक प्रवीण कदम, आनंद ऋषी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सुनील महानोर आणि गाडी घुंगराची फेम विलास अटक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. मार्तंडराव बुचुडे सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी परिसरातील नागरिक, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
📍 स्थळ : हॉटेल लकी, पारनेर-सुपा रोड, संभाजीनगर, पारनेर, जि. अहिल्यानगर
📅 दिनांक : २७ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
“रक्तदान करा… जीवनदान करा!”
रमीज राजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
