भाळवणी / प्रतिनिधी, 
ढवळपुरी सारख्या दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षण घेत आहेत असे प्रतिपादन पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांनी ढवळपुरी येथे केले. यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे, मुख्याध्यापक संदीप महांडुळे, शिक्षक लतीफ राजे, राजाराम वाघ, वसंत काळे, संतोष पट्टेकर, प्रशांत पादिर, देवका पायमोडे, समाधान भुसारे, कृष्णा धुमाळ, भावना बेरड आदी उपस्थित होते.
       गटशिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे व केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेला भेट दिली असता त्यांचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी सत्कार केला. यावेळी पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेला प्राथमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी आश्विन संजय गिरवाल याचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे म्हणाले की, आयुष्यामध्ये मोठे व्हायचे असेल तर शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. शालेय जीवनात शिक्षण घेत असताना श्रम, प्रतिष्ठा व स्वयं अध्ययन करणे खूप गरजेचे आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धा वाढलेली असून यामध्ये टिकण्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमधून मार्गदर्शन केले पाहिजे. जे आश्रमशाळा ढवळपुरी येथे होताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे क्लासेस नसतानाही येथील विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करत आहेत. यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक घेत असलेले परिश्रम महत्त्वाचे आहे. 

🔶🔶🔶🔶🔶🔶

सर्व शिक्षकांचे अभिनंदन 
मागील वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथील १५ विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण होऊन पात्र झाले असून अश्विन संजय गिरवाल हा जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे. या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक राजाराम वाघ तसेच इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक लतीफ राजे, गणिताचे शिक्षक भावना बेरड व बुद्धिमत्तेचे शिक्षक समाधान भुसारे, प्रशांत पादीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते म्हणून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. अश्विन संजय गिरवाल याने ३०० पैकी २४४ गुण मिळवले असून इंग्रजी विषयामध्ये त्याला ५० पैकी ५० गुण मिळालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version