३० वर्षे सेवा केलेल्या डॉक्टरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (पीटीएमपीए) अध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब पठारे यांची निवड झाली आहे.शिरापूर (अळकुटी) ऑरन्सन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहमेळाव्यात मावळते अध्यक्ष डॉ.संदिप औटी यांनी यांची निवड जाहीर केली.यावेळी ३० वर्षे वैद्यकीय सेवा पूर्ण केलेल्या डॉ.प्रमोद पितळे आणि डॉ.किशोरकुमार पुरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला., गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी अध्यक्ष डॉ. संदीप औटी, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकळे, सचिव डॉ. पांडुरंग थोरात, सहसचिव डॉ. सुशील पादीर, खजिनदार डॉ. अरविंद नांगरे आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डॉ. पांडुरंग थोरात यांनी प्रभावीपणे केले. या स्नेहमेळाव्यास पारनेर तालुक्यातील अनेक डॉक्टर सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.
🔶🔶🔶🔶🔶
नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण….
या वेळी पीटीएमपीएच्या नवीन कार्यकारिणीने पदग्रहण केले. अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पठारे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत गाडगे, सचिव डॉ. दत्ता दातीर, सहसचिव डॉ. तनुजा रोहोकले,खजिनदार डॉ. सुभाष मावळे यांनी पदभार स्वीकारला
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
संघटना बळकटीचा संकल्प….
पुढील वर्षात विविध उपक्रम राबवून संघटनेची एकजूट अधिक मजबूत केली जाईल.मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल.समाजहिताचे उपक्रम राबवण्यात येतील.तसेच संघटना बळकटीकरणासाठी भरीव निधी उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.
– डॉ. बाळासाहेब पठारे,
अध्यक्ष,पीटीएमपीए
