पारनेर/ प्रतिनिधी,

माजी आमदार (ओमप्रकाश) उर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पारनेर तहसील कार्यालयावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांना हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला बळी पडून शेतकऱ्यांनी महायुती सरकारला सत्ता दिली. मात्र, सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले तरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. याच्या निषेधार्थ बच्चू कडू यांनी लोकशाही मार्गाने पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, सरकारने त्वरित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून दिलासा द्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिला.

यावेळी युनिटी ऑफ मुलनिवासीचे राजेंद्र करंदीकर, संतोष दादाभाऊ कांबळे, अरुण गंगाराम बेलकर, अविनाश देशमुख, अनिल सोबले, पांडुरंग पडवळ, जय गायकवाड, प्रवीण खोडदे, रघुनाथ मांडगे, बाळासाहेब वाळुंज, नंदन भोर, सुरेश गोळे, पोपट सोनवणे, गणपत गुंड, संभाजी वाळुंज, सुभाष करंजुले, वसंत साठे, विशाल करंजुले, तेजस भोर, गणेश दळवी, नारायण रोकडे, सतीश बागल यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेने सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली असून, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन व्यापक स्वरूप धारण करेल, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version