पारनेर / भगवान गायकवाड, 
पारनेरच्या जनतेने भाकपचा जिल्हा परिषद वा पंचायत समिती मध्ये सातत्याने प्रतिनिधी निवडून दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक समविचारी पक्षांसोबत आघाडी करून किंवा स्वबळावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष ताकतीने लढवणार असल्याचे प्रतिपादन भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले .
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षा निमित्त ज्येष्ठ सहका-यांचा सन्मान तसेच राज्यसचिव पदी कॉ. सुभाष लांडे यांची निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन पारनेर तालुक्याच्या वतीने कान्हूर पठार येथे केले होते. या प्रसंगी बोलताना सुभाष लांडे म्हणाले की मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातील ६६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे व या काळात राज्याचे कृषिमंत्री मात्र शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात व रमी खेळण्यात व्यस्त आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मागील दहा वर्षांत १६ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात टाकले आहे व शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी मात्र समितीवर समिती गठीत करत आहे. एकीकडे गतिमान महाराष्ट्र म्हणायचे व दुसऱ्या बाजूला राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त शाळा बंद भीती निर्माण झाली आहे. 

या प्रसंगी तालुका सचिव संतोष खोडदे यांनी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मुग बाजरी या पिकांना धोका निर्माण झाला आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. शेती पंपांना अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना दिव्यांग लाभार्थी यांचे मानधन वेळेवर जमा होत नाही या विषयांवर आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
या मेळाव्यात पक्षातील ज्येष्ठ सहकारी बापूराव दिवटे, बबन जोशी, चैनजी वाळुंज, मारुती गायकवाड, भाऊसाहेब भगत, गणपत ठुबे यांचा शताब्दी वर्षानिमित्त स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सहसचिव सुधीर टोकेकर, माजी सरपंच गोकुळ काकडे बाजार समितीचे माजी संचालक संजय भगत तालुका सहसचिव बबन रावडे, किसान सभेचे सचिव संपत रावडे, उपाध्यक्ष बापू गायकवाड धोंडीभाऊ सातपुते ,किरण खामकर,भागवत गायकवाड, संजय जाधव, बापूसाहेब घुमटकर जयसिंग गायकवाड कारभारी आहेर रंगनाथ शिंदे अशोक गायकवाड, सुदाबाई आदमने, मैनावती दिवेकर रखमाबाई शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ बबनराव सालके होते. प्रास्ताविक किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुभाष ठुबे यांनी केले व सुत्रसंचलन देवदत्त साळवे यांनी केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव पदी निवड झाल्याबद्दल सुभाष लांडे यांचा पारनेर तालुका कमुनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version